आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Enthusiasm For Voter Card Among Diaspora In Jammu And Kashmir, New Voter To Be Kingmaker

दिव्‍य मराठी ग्राउंड रिपोर्ट:जम्मू-काश्मिरातील परप्रांतीयांत मतदार कार्डासाठी प्रचंड उत्साह, नवीन मतदार ठरणार किंगमेकर

मोहित कंधारी | जम्मूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मिरात निवडणुकीपूर्वी मतदार यादी तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. यंदा २५-३० लाख नव्या मतदारांचा यादीत समावेश होऊ शकतो. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार इतर राज्यातील नागरिकही या ठिकाणी मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतात, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाच्या या घोषणेनंतर इतर राज्यातून आलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. मतदानाचा हक्क मिळाल्याने आता आमचाही आवाज ऐकला जाईल, असे परप्रांतीयांचे म्हणणे आहे. तथापि, काश्मिरातील प्रादेशिक पक्षांचा याला विरोध आहे. ‘भास्कर’ प्रतिनिधीने जम्मूतील परप्रांतीय नागरिकांची वसाहत असलेल्या दिगिआना, प्रीतनगर, नानकनगर, मीरा साहिब कुंजवानी, कासीमनगर, राजीवनगर आदी भागांचा दौरा केला.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून आलेले फळ विक्रेते अजय शहा म्हणाले, माझे वडील १९८१ मध्ये जम्मूत वास्तव्यासाठी आले. माझी दोन मुले वाणिज्य महाविद्यालयात शिकतात. आम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करीत होतो. परंतु कलम ३७० मुळे विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागत होते. आता हा अडथळा दूर झाला आहे. कुटुंबातील सर्व ८ सदस्यांचे मतदार कार्ड बनवत आहे. त्यांचे पिता भूपाल शहा म्हणाले, सन १९९६ व २००२ च्या निवडणुकीत काही परप्रांतीयांनी मतदान केले होते.परंतु विरोधी पक्षांनी विरोध केल्याने मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. अन्य एक नागरिक चंद्रकांत यांनी सांगितले की, मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.मतदान प्रक्रियेत भाग घेतल्याने आपल्या आवडीचे सरकार निवडणे शक्य होईल. छत्तीसगडचे जांजगीर चंपाचे रहिवासी छबीलाल भारद्वाज म्हणाले, ३३ वर्षांपासून मी जम्मूत राहतो. मलाही सन्मान मिळावा असे वाटते. यापुढे तहहयात जम्मूत राहण्याची इच्छा आहे. माझ्या कुटुंबीयांचेही नाव मतदार यादीत नोंदवणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकारच्या योजनांचा लाभ उठवणे आम्हाला शक्य होणार आहे.

जम्मू-काश्मिरात १५ लाख परप्रांतीयांचे १० वर्षांपेक्षा अधिक काळ वास्तव्य जम्मू-काश्मीरची पूर्ण अर्थव्यवस्था परप्रांतीय नागरिक, कामगार आणि व्यावसायिकांवर निर्भर आहे. मोठे प्रकल्प, उड्डाणपूल, सुरुंग, महामार्ग असो वा घरबांधणी, सर्वच कामे त्यांच्यामुळे पूर्ण होतात.

भातशेती, सफरचंद बाग, वीटभट्ट्या, टेलरिंगचे काम ते करतात. राज्यात सुमारे १५ लाख परप्रांतीय नागरिक गेल्या १० वर्षांपासून वास्तव्य करून आहेत, असा एक अंदाज आहे. थोड्या कालावधीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही गृहीत धरल्यास हा आकडा २५ लाखांपर्यंत जातो. पूर्ण राज्यात रस्त्याच्या कडेला यांच्या छोट्या वसाहती आहेत. त्याला ‘छोटा बिहार’ नावाने ओळखले जाते.

लोकसभेसाठी परप्रांतीयांचे अनेक वर्षांपासून मतदान जम्मू-काश्मिरातील जागा जिंकण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार इतर राज्यातील मतदारांना आयात करीत आहे, असा आरोप येथील राजकीय पक्ष करीत आहेत. वास्तविक, परप्रांतातून आलेले नागरिक अनेक वर्षांपासून येथे कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावत आहेत. सन २०१९ मध्ये परप्रांतीयांचे ३२ हजार मतदान झाले होते.

बातम्या आणखी आहेत...