आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Entry Of Shraddha Massacre In Gujarat Elections I Himmata Biswa's Statement I Entry Of Shraddha Massacre In Gujarat Elections I Latest News

..तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येईल:आसामचे CM बिस्वांचे वक्तव्य; गुजरात निवडणुक प्रचारात श्रद्धा हत्याकांडांची एन्ट्री

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड घटनेने संपूर्ण देशवासियांचा थरकाप उडाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आफताबने श्रद्धाच्या हत्येची चर्चा होत आहे. तर या हत्याकांडाला लव्ह जिहादचे देखील स्वरूप दिले जाऊ लागले आहे. पोलिस तपासात श्रद्धाच्या हत्यारा आफताबचा चेहरा सर्वांसमोर येवू लागला आहे. दरम्यान, श्रद्धा हत्याकांडाचे प्रकरण आता गुजरात निवडणुकीतील प्रचारादरम्यान चर्चिले जाऊ लागले आहे. गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचार रॅलीत श्रद्धा हत्याकांडाचा मुद्दा घेत काही नेते आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा

गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे कच्छ भागात आलेले आहेत. कच्छ प्रांतातील एक सभेत बोलताना हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, 2024 ला PM पदी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा बसतील. पंतप्रधान पदासाठी ते अत्यंत सक्षम नेते आहेत. जर देशाला सक्षम व सर्वांगिण विकास करणारा नेता मिळाला नाही तर प्रत्येक शहरात आफताब सारखे जन्माला येतील, यामुळे देशाचे संरक्षण करने अवघड होईल. CM शर्मा यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादशी जोडले. ते पुढे बोलताना म्हणाले की, श्रद्धाला मुंबईवरून दिल्लीला आणले गेले. त्या ठिकाणी तिच्या शरीराचे 35 टुकडे केले गेले. तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून अन्य मुलींना देखील घरी घेऊन येत होता आफताब. अशा घटना न होण्यासाठी देशाला सक्षम नेत्याची गरज असल्याचे हिमंता बिस्वा यांनी सांगितले.

खासदार साक्षी महाराजांचाही विरोधकांवर हल्ला

श्रद्धा खून प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय बनले आहे. आफताबने ज्या प्रकारे श्रद्धाला मारून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, ते ऐकून मन हेलावून जाते. याप्रकरणी भाजप खासदार साक्षी महाराज यांचे वक्तव्यही समोर आले आहे. याप्रकरणी भाजप खासदारांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले की, या प्रकरणी विरोधी पक्षातील लोक एवढे चडीचूप का आहेत. त्यांना काय साप चावला आहे का, तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यापैकी कोणीही का बोलत नाही.

बातम्या आणखी आहेत...