आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर येथे सर्व पर्यटन आणि इको-टूरिझमवर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याची अधिकृत माहिती यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी दिल्लीत जैन समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर यादव म्हणाले - झारखंडमधील पारसनाथ पर्वतावर असलेले जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरचे पावित्र्य जपण्याचे आवाहन करणाऱ्या जैन समाजातील लोकांची भेट घेतली. समेद शिखरसह जैन समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांना आश्वासन दिले.
केंद्र सरकारने 2019 मध्ये केले होते अधिसूचित
2019 मध्ये, केंद्र सरकारने सम्मेद शिखरला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले. यानंतर झारखंड सरकारने जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीवरून त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा ठराव जारी केला. गिरीडीह जिल्हा प्रशासनाने नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी 250 पानांचा मास्टर प्लॅनही तयार केला आहे.
पर्यावरण मंत्रालयाची दोन पानांची अधिसूचना खाली वाचा…
पारसनाथ पर्वतावर या उपक्रमांवर बंदी घालण्यात येणार
सम्मेद शिखराचे हे आहे महत्त्व
झारखंडचा हिमालय मानल्या जाणार्या या ठिकाणी जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र शिखरजी स्थापित आहे. या पवित्र परिसरात जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. भगवान पार्श्वनाथ, 23 वे तीर्थंकर यांनीदेखील येथे निर्वाण प्राप्त केले. पवित्र पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी भाविक पायी किंवा डोलीने जातात. जंगल आणि पर्वतांच्या दुर्गम वाटांमधून ते शिखरावर पोहोचण्यासाठी नऊ किलोमीटरचा प्रवास करतात.
यामुळे होतोय विरोध
या विषयावर सम्मेद शिखरावर विराजित मुनिश्री प्रमाण सागरजी म्हणाले की, सम्मेद शिखर हे इको-टूरिझम नसावे, ते इको-तीर्थ असावे. सरकारने संपूर्ण प्रदक्षिणा आणि त्याच्या 5 किलोमीटर परिघातील क्षेत्र हे पवित्र स्थान म्हणून घोषित करावे, जेणेकरून त्याचे पावित्र्य अबाधित राहील. पर्यटन स्थळ झाल्यानंतर येथे मांस-दारू आदींची विक्री होईल, अशी भीती जैन समाजाला आहे, हे समाजाच्या भावनेच्या -मान्यतेच्या विरुद्ध आहे.
सम्मेद शिखरशी संबंधित हेही वृत्त वाचा...
प्रमाण सागरजी म्हणाले - इको सेन्सिटिव्ह झोनवर हरकत नाही:सम्मेद शिखरजी जैनांचे पर्यटन तीर्थक्षेत्र घोषित झाले तर विचार करू
'झारखंड सरकारने सम्मेद शिखरजीला जैन समुदायाचे धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले, तर त्यावर विचार होऊ शकतो. हे धार्मिक जैन तीर्थक्षेत्र असावे. येथे होणारी सर्वच कामे धार्मिक रीतिरिवाजानुसार व्हावीत. पर्यटन स्थळासारखे एकही काम होता कामा नये. पण सरकारने अजून अधिकृतपणे आपली बाजू स्पष्ट केली नाही,' असे सम्मेद शिखरजीमध्ये विराजमान जैन संत प्रमाण सागरजी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनवर जैन समुदायाची कोणतीही हरकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येथे वाचा संपूर्ण मुलाखत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.