आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-पास महत्त्वाचे निर्देश:प्रवास, मालवाहतुकीवर बंदी नको : केंद्राचे राज्यांना निर्देश, अनलाॅक-३ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा : केंद्रीय गृह सचिव

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत

राज्याअंतर्गत प्रवासासाठी आवश्यक ई-पासवर मोठी टीका होत असताना केंद्रानेही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अनेक राज्यांत माल व प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आहेत. यामुळे पुरवठा साखळी, आर्थिक बाबी आणि रोजगारावर परिणाम होत आहेत. त्यामुळे तातडीने हे निर्बंध हटवले जावेत, असे निर्देश केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना दिले आहेत.

केंद्राने वाहतुकीवरील निर्बंध हटवले आहेत. पण राज्य आणि स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी प्रवासी वाहतुकीसाठी अजूनही ई-पासची गरज आहे, किंवा काही राज्यांत प्रवासी वाहतूक बंद आहे. अजय भल्ला यांनी अनलॉक-३ च्या नियमावलीकडे लक्ष वेधले आहे. राज्यांनी स्थानिक पातळीवर लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वस्तू आणि सेवांची वाहतूक, पुरवठा साखळी, आर्थिक कामकाज बिघडणे आणि बेरोजगारी वाढणे असे परिणाम होत आहेत. आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतीही बंधने नसतील, असे केंद्राने आपल्या अनलॉकिंगच्या नियमावलीत स्पष्टपणे सांगितले आहे.