आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल,दिल्ली मनपा पराभव:उमेदवार निवडीत चूक; बंडखोर उमेदवारांमुळे हरला भाजप

नवी दिल्ली / सुजीत ठाकूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक आणि दिल्ली महानगर पालिका निवडणुकीतील पराभवाचे कारण गुरुवारी मुख्यालयात झालेल्या बैठकीत भाजपने शोधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात त्रुटींवर चर्चा झाली. उमेदवार निवडीतील चूक, बंडखोरांना आपलेसे करण्यात आलेले अपयश हे पराभवाचे एकमेव कारण आहे. यासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल. दोन्ही ठिकाणी पक्षाचा मत टक्का अपेक्षेनुसार राहिला. दुसरे म्हणजे, निवडणुकीत जे मुद्दे पक्षाने उपस्थित केले होते ते योग्य होते. तिसरे म्हणजे, चर्चाही पक्षानुरूप राहिली. कारण, विरोधी पक्ष त्यानुसारच आरोप करत राहिले.

संघटनेमध्ये अधिकार बदलाची प्रक्रिया होणार भारतीय जनता पक्षाकडून कोणत्याही पदाधिकाऱ्याला पदावरून हटवले जाणार नाही. मात्र, आगामी निवडणुकांसाठी त्यांना तिकीट वाटप वा अन्य कामांसाठी पूर्ण सूट दिली जाणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी संघटनेत अधिकार बदल होईल.

बातम्या आणखी आहेत...