आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी अजान बाबत वादग्रस्त विधान केले आहे. सोमवारी मंगळुरूमध्ये ईश्वरप्पा म्हणाले की, अल्लाहाला बोलावण्यासाठी लाऊड-स्पीकरवर ओरडण्याची काय गरज आहे. अजानच्या आवाजाने माझे डोके दुखते.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ईश्वरप्पा एका सार्वजनिक सभेला संबोधित करत होते. त्यावेळी जवळच्या मशिदीतून अजान सुरू होते. यावेळी ईश्वरप्पा म्हणाले की, मी जिथे जातो तिथे या अजानमुळे माझे डोकेदुखी वाढते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे. आज नाही तर उद्या अजान बंद होईल. पुढे म्हणाले की, हिंदूही मंदिरात भजन आणि प्रार्थना करतात, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आहोत.
ईश्वरप्पा म्हणाले - आम्ही मंदिरात लाऊडस्पीकर नाही वापरत
ईश्वरप्पा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सर्व धर्मांचा आदर करण्यास सांगितले आहे, परंतु मला विचारायचे आहे की अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वापरल्यावरच अल्लाह नमाज ऐकतो का? हिंदूही मंदिरात भजन-प्रार्थना करतात ना? ईश्वरप्पा पुढे म्हणाले की, तुम्ही आम्ही देखील त्यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आहोत. आणि ही भारतमाता आहे की, जे धर्मांचे रक्षण करते. पण जर तुम्ही म्हणत असाल की, अल्लाह तेव्हाच ऐकतो जेव्हा ते लाऊडस्पीकरवरून अजान ऐकतो. तर ईश्वरअप्पा म्हणाले की, मी जरूर विचारेन की, मग काय अल्लाह बहिरा आहे का?, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
टिपू सुलतान यांना मुस्लिम गुंड म्हटले होते
ईश्वरप्पा यांनी यापूर्वीही अशी विधाने केली आहेत. यापूर्वी त्यांनी 18व्या शतकातील म्हैसूर शासक टिपू सुलतान यांना मुस्लिम गुंड म्हटले होते. गेल्या वर्षी एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्यानंतर ईश्वरप्पा यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. आपल्या शेवटच्या सुसाईट नोटमध्ये ठेकेदाराने त्याच्या मृत्यूसाठी ईश्वरप्पा यांना जबाबदार ठरवले होते.
गेल्यावर्षी लाऊडस्पीकरचा मुद्दा कर्नाटक हायकोर्टात पोहोचला
अजान हा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. अजानसाठी लाऊडस्पीकरच्या वापरामुळे इतर धर्माच्या लोकांना त्रास होऊ शकतो, असा युक्तिवाद एका वर्गाकडून केला जात आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मशिदींना याबाबत कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला होता. अजानमुळे इतर धर्माच्या लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
SC ने 2005 मध्ये लाऊडस्पीकरवर घातली होती बंदी
जुलै 2005 मध्ये, सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या चिंतेचा हवाला देत आपत्कालीन परिस्थिती वगळता रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घातली. यानंतर ऑक्टोबर 2005 मध्ये न्यायालयाने सांगितले की, वर्षातील 15 दिवस सणांच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
हे ही वाचा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.