आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ETV BHARAT JOURNALIST NIVEDITA SOORAJ | Thrilling Video Of Accident Captured On CCTV, Incident In Hayatnagar, Hyderabad

तरुणींना कारने उडवलं:अपघाताचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद, एकीचा मृत्यू, एक तरुणी गंभीर जखमी; हैदराबादच्या हयातनगरमधील घटना

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. अनेकदा हे अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतात. याचे व्हिडिओ थरकाप उडवणारे असतात. हैदराबादच्या हयातनगर परिसरात अशाच एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यात एका कारने दोन तरुणींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती, यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. दुसरी तरुणी गंभीर जखमी आहे.

या अपघातामध्ये मृत्यू झालेली तरुणीचे नाव निवेदिता सूरज असे आहे. निवेदिता सूरज शनिवारी (दि. 19) सकाळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून ऑफिसला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. यावेळी एलबी नगरच्या बाजूने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. निवेदिता सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक तात्काळ फरार झाला. धडक बसल्याने कार दुभाजकाला धडकली आणि विरुद्ध दिशेने जाऊन पडली. पोलिसांनी कार ताब्यात घेतली. हयातनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

निवेदिता सूरज या हैदराबादमधील ETV Bharat या न्यूज पोर्टलमध्ये कंटेन्ट एडिटर म्हणून काम करत होत्या. निवेदिताने रिपोर्टर टीव्हीच्या त्रिशूर ब्युरोमध्येही काम केले. मे 2021 रोजी ETV Bharat मध्ये त्या रुजू झाल्या होत्या. इरिंगलाकुडा त्रिशूर जिल्ह्यातील तिच्या विरुथीपारंबिल निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले.

धडकल्यानंतर हवेत उडाली दुचाकी

जबलपूरच्या अधारताल पोलिस ठाणे अंतर्गत जय प्रकाश नगरमध्ये वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक लोकांनी जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले, तर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

गोंदिया स्थानकातील थरारक घटना

म्हणतात ना..काळ आला पण वेळ आली नाही. असाच प्रकार एका पंचवीत ते तीस वयोगटातील तरुणीसोबत घडला. प्रसंग होता गोंदीया रेल्वेस्थानकातील. गाडी चालु होती पण तरुणीने याचे भान न ठेवता ती खाली उतरली, तोच तिचा तोल गेला आणि ती परत रेल्वे आणि प्लॅटफार्मच्यामध्ये जात होती हे पाहताच आरपीएफ जवानाने या महिलेचा जीव वाचवला. या जवानाच्या रुपात तिला जणू देवदुतच भेटला. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...