आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १६.१% लोकांत डेल्टा व्हेरिएंटला (बी १.६१७.२) प्रतिबंध करणाऱ्या अँटिबॉडीज आढळल्या नाहीत. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. तथापि, अजून या अभ्यासाचे पीयर रिव्ह्यू (तज्ज्ञांकडून पुनरावलोकन) होणे बाकी आहे. त्यानंतरच ठोस असा निष्कर्ष समोर येऊ शकणार आहे.
सीरम नमुन्यांच्या अभ्यासात आढळले की, कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर ५८.१% लोकांत न्यूट्रलायझिंग अँटिबॉडीज सापडल्या नाहीत. मात्र या अभ्यासाबाबत वेल्लोर येथील क्रिश्चियन मेडिकल कॉलेजमधील मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. टी. जेकब यांनी म्हटले आहे की, ‘आढळले नाही याचा अर्थ असा नव्हे की अँटिबॉडीज अस्तित्वातच नाहीत.
अँटिबॉडीजचा स्तर खूप कमी झाल्यानंतर त्या कधी कधी सापडत नाहीत. परंतु तो अस्तित्वात असतो आणि व्यक्तीला संसर्ग किंवा आजारापासूनही वाचवू शकतो.’ डॉ. जॉन यांच्यानुसार, अभ्यासासाठी घेतलेले नमुने निरोगी व्यक्तींचे होते. अशक्त व मधुमेही लोकांनी बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
.. तर तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये : शास्त्रज्ञांचा इशारा
कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी दिशानिर्देशांचे काटेकोर पालन केले नाही तर येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये तिसरी लाट पीक स्तरावर असेल, असा इशारा सरकारी पॅनलवरील शास्त्रज्ञ मानिंद्र अगवाल यांनी दिला आहे. अायअायटी कानपूरमध्ये कार्यरत डॉ. अग्रवाल मागील वर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे स्थापन समितीचे सदस्य आहेत. या समितीची स्थापना गणितीय मॉडेलचा वापर करून कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत अंदाज व्यक्त करण्यासाठी करण्यात आली आहे. अग्रवाल यांनी म्हटले आहे की, तिसऱ्या लाटेत नवीन बाधित रुग्णांची संख्या दुसऱ्या कोरोना लाटेपेक्षा निम्मी असेल. विषाणूचे नवे व्हेरिएंट पुन्हा समोर आले तर तिसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने पसरेल, असेही ते म्हणाले.
डेल्टा व बी१ विरुद्ध प्रतिकारशक्ती
या अभ्यासात आढळून आले की, विषाणूला निष्प्रभ करणाऱ्या अँटीबॉडीजचे प्रमाण बी-१च्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटमध्ये कमी होते. लसीचा एक डोस घेणाऱ्यांत बी-१ च्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधातील अँटीबॉडीज ७८% कमी होत्या. दोन्ही डोस घेणाऱ्यांत अँटीबॉडीजचे प्रमाण ६५% कमी आढळले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.