आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Even Corona Could Not Stop; Bihar Government Gave 1 Lakh Each For 24 Poor Girls 'UPSC Pre' Pass

संघर्ष:कोरोनाही रोखू शकला नाही; 24 गरीब मुली ‘यूपीएससी प्री’ पास, ‘मेन्स’साठी बिहार सरकारने 1-1 लाख रुपये दिले

आलोक द्विवेदी/ पाटणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
परीक्षेत यश मिळवणाऱ्या नेहा आणि सुब्रा राय. - Divya Marathi
परीक्षेत यश मिळवणाऱ्या नेहा आणि सुब्रा राय.

कोरोनाचा आव्हानात्मक काळ. रस्त्यांवर शांतता. ऑक्सिजन, औषधांसाठी धडपडणारे लोक. प्रत्येक व्यक्ती भेदरलेली दिसत होती. पण संघर्षाच्या या काळातही बिहारच्या तीन हजारपेक्षा जास्त मुलींनी घरी बसूनच यूपीएससी प्रीची (पूर्वपरीक्षा) तयारी केली. १६ महिन्यांच्या तयारीनंतर २४ मुली पूर्वपरीक्षेत यशस्वी ठरल्या. मेन्सच्या तयारीसाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबतच समाजकल्याण विभागाने सहकार्य केले. पूर्वपरीक्षेत यशस्वी ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला विभागातर्फे एक-एक लाख रुपये देण्यात आले. अशाच काही मुलींचा संघर्ष वाचा त्यांच्याच शब्दांत...

लोकांना मदत करत शिक्षण सुरू ठेवले अन् यश मिळाले
आजूबाजूस सगळीकडे गोंधळ सुरू होता. कुठे मृत्यू होत होते, तर कुठे ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ सुरू होती. सर्वांचे चेहरे असे दिसत होते की जणूकाही दयेची भीक मागत आहेत. अशा तणावग्रस्त वातावरणात लोकांना मदत करत पूर्वपरीक्षेची तयारी केली आणि यश मिळवले. -नेहा (मुजफ्फरपूर)

पहिल्याच प्रयत्नात ‘प्री’मध्ये यश, आता ‘मेन्स’ची तयारी
कोचिंगसाठी सतत केंद्रांशी संपर्क केला. पण फीस खूप असल्याने ते शक्य झाले नाही. ‘शांत वातावरण आहे, घरीच तयारी कर,’ असा सल्ला वडील सुधीरकुमार राय यांनी दिला. वडिलांच्या पाठिंब्यामुळे पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. मदतीच्या रकमेतून मेन्सची तयारी होऊ शकेल.- सुब्रा राय (पाटणा)

कोरोनात वडिलांची नोकरी गेली, भावाने केली मदत
वडील हरिभूषण खासगी नोकरीत होते. कोरोनाकाळात तीही सुटली. अडचणीत असताना भाऊ कोषांगने घरीच माझ्या अभ्यासाची सर्व जबाबदारी घेतली. जुनी पुस्तके, नियतकालिकांच्या मदतीने पहिल्या प्रयत्नात यश मिळाले. आता ‘मेन्स’मध्ये उत्तीर्ण होण्याचे लक्ष्य आहे.- प्रियंका, केतुका (दरभंगा)

८०% लोक कोरोनाग्रस्त, छतावर राहून केली तयारी
गावातील १० पैकी ८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होता. बहुतांश वेळ छतावर जायचा. वडील रवींद्रकुमार यांनीच सेवेशी संबंधित पेशा निवडण्यास प्रेरित केले. सर्व बंद असल्याने एकटीनेच तयारी सुरू केली. १६ महिन्यांच्या तयारीनंतर पूर्वपरीक्षेत यश मिळवले. - क्षिप्रा मालवीय, मालही (जमुई)

बातम्या आणखी आहेत...