आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना महारोगराई उच्च पातळीवर होती तेव्हा अर्थव्यवस्थेला गावांतून मदत मिळाली होती. याचे कारण म्हणजे चांगल्या मान्सूनमुळे चांगले पीक होते आणि क्षेत्रही वाढले होते. जास्त उत्पादनामुळे कृषी उत्पन्नाचे भाव पडतील, अशी तज्ज्ञांना अपेक्षा होती. मात्र, याच्या उलटे झाले. बहुतांश कृषी पिकाचे भाव वाढले आहेत. सध्या मक्याशिवाय अन्य सर्व पिकांचे भाव त्यांच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) वर आहेत. यामुळे ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेत चमक आणखी वाढली आहे. कृषी तज्ज्ञांनुसार, भारतातून तांदूळ आणि गव्हासारख्या कृषी जिनसांची निर्यात वाढली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात यांना उच्च किंमत मिळत आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता म्हणाले, सरकारची धोरणे शेतकऱ्यांना अनुकूल आहेत. अर्थसंकल्पात कृषी जिनसांवर आयात शुल्क वाढवणे हे याचे उदाहरण आहे. कृषी जिन्नस बाजारपेठेच्या धारणेवर यामुळे परिणाम झाला. अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) अंदाजानुसार, या वर्षी भारतात गहू आणि तांदळाचा पुरवठा आणि मागणी देान्ही वाढेल. या प्रकरणात सलग पाच वर्षे विक्रम होण्याची शक्यता आहे. भाव तेजीत राहण्याचे एक हेही कारण आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वित्त वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तीन तिमाहीत (डिसेंबर २०२० पर्यंत) भारतातून गव्हाची निर्यात ४५६.४१% वाढून १,८७० रु. झाली आहे. या दरम्यान बिगर बासमती तांदळाची निर्यात १२२.६१ टक्के वाढून १०,२६८ कोटी रुपयांवर पोहोचली. मात्र, बासमतीची निर्यात केवळ ५.३१% वाढली, मात्र यामुळे २२,०३८ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. याशिवाय भरड धान्याच्या निर्यातीतही १८९.०९% ची उसळी आली.
मेपर्यंत बदलणार नाही कल
चीनने भारताकडून तांदळासारख्या कृषी जिनसांची आयात सुरू केली आहे. दर्जा सुधारल्यामुळे भारतीय गव्हाची मागणी आता युरोपातही निघू लागली आहे. अशा त १५ मेआधी धारणा बदलण्याची शक्यता नाही. - अनुज गुप्ता, उपाध्यक्ष (रिसर्च, कमोडिटी अँड करन्सी),
विदेशी खरेदीचा परिणाम
देशात कापसाचे क्षेत्र वाढले आहे, मात्र पिकाचे नुकसान झाले आहे. चीन सतत कापूस खरेदी करत आहे. कापूस २३,५००-२४,००० रु. प्रति बेलची (१७० किलो) पातळी स्पर्श करू शकतो. - अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायझरी
कापसाचा सध्याचा भाव एमएसपीपेक्षा अडीचपट वर
जिन्नस बाजारपेठेच्या धारणेवर यामुळे परिणाम झाला. अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) अंदाजानुसार, या वर्षी भारतात गहू आणि तांदळाचा पुरवठा आणि मागणी देान्ही वाढेल. या प्रकरणात सलग पाच वर्षे विक्रम होण्याची शक्यता आहे. भाव तेजीत राहण्याचे एक हेही कारण आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, वित्त वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तीन तिमाहीत (डिसेंबर २०२० पर्यंत) भारतातून गव्हाची निर्यात ४५६.४१% वाढून १,८७० रु. झाली आहे. या दरम्यान बिगर बासमती तांदळाची निर्यात १२२.६१ टक्के वाढून १०,२६८ कोटी रुपयांवर पोहोचली. मात्र, बासमतीची निर्यात केवळ ५.३१% वाढली, मात्र यामुळे २२,०३८ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. याशिवाय भरड धान्याच्या निर्यातीतही १८९.०९% ची उसळी आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.