आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Even If I Made A Mistake, Hang Me At Vijay Chowk !, Supriya Sule Angry In Lok Sabha

लोकसभेत सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला प्रश्न:चूक झालीही असेल तर मला विजय चौकात फाशी द्या!, सुप्रिया सुळे लोकसभेत संतप्त, तपास यंत्रणांचा कारभार आणला चहाट्यावर

दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तपास यंत्रणा स्वायत्त असतील तर कोणावर छापा पडणार ही माहिती चार-पाच दिवस आधीच ट्विटरवर कशी येते. कोण कधी तुरूंगात जाणार याची खबर भाजप नेत्यांकडे असते याबाबत माझ्याकडे तारखेनुसार पुरावे आहेत. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. चूक झालीही असेल तर मला फाशी द्या. इथे नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर

आमच्यावर खटला चालवा पण पारदर्शक काम करा, न्याय करा अशा संतप्त भावना राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. सुप्रिया सुळे लोकसभेत तपास यंत्रणांचा गैरव्यवहार, मोदी सरकारचा कारभार व महागाई यावर त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर छापा पडणार हे ४-५ दिवस आधीच कसे समजते? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असे बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसे माहिती होते?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.

सुप्रिया सुळेंनी सांगितले दोन अर्थ

तपास यंत्रणांच्या छाप्यांची ट्विटरवर पडणाऱ्या माहितीबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. खरे बोला, अमित शाह खरे बोलतात. मला वाटते मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवे. सरकारमध्ये इतर कोण खरे बोलते याबाबत माहिती नाही. अमित शाह तर नक्की खरं बोलतात, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला.

मोदी सरकारकडे न्याय मागतेय

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुसरी गोष्ट म्हणजे ही माहिती लिक होत आहे का? जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकले जाते. आता जेव्हा तुमचे २ कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती आहे. मी हे सिद्ध करू शकते. तुम्हाला कोणीही विचारणार नाही का? मी मोदी सरकारकडे न्याय मागत आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. पारदर्शक काम करा आणि न्याय करा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...