आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटगी:पती भिकारी असेल तरी पत्नीचा सांभाळ करणे ही त्यांची जबाबदारी, हायकोर्टाचा निर्वाळा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती भिकारी असेल तरी पत्नीचा सांभाळ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असा निर्वाळा पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने दिला आहे. पत्नीची देखभाल करणे हे पतीचे नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाच्या प्रकरणात पती पत्नीला दरमहा 5 हजार रुपये पोटगी देईल असा निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ही याचिका फेटाळत पतीने पत्नीला पोटगी देणे हे त्याचे नैतिक आणि कायदेशीर बंधन आहे, असे म्हटले आहे.

5 हजार रुपये जास्त नाही

हायकोर्टात पत्नीचे स्वतःचे उत्पन्नाचे साधन आहे, असा युक्तिवाद पतीने केला होता. असे असतानाही ती त्याच्याकडे पोटगीची मागणी करत आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सांगितले की, आजच्या युगात रोजंदारी करणाराही दिवसाला 500 रुपये कमावतो. अशा परिस्थितीत दरमहा पाच हजार रुपये पोटगी जास्त मानता येणार नाही. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने सांगितले की याचिकाकर्ता पत्नीच्या उत्पन्नाशी संबंधित कोणतेही पुरावे न्यायालयात सादर करू शकत नाही. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली.

अंधेरी न्यायालयाचा निकाल

अंधेरी न्यायालयाने जानेवारी महिन्यात एक निर्णय दिला होता. यात पती भिकारी किंवा अधू जरी असला तरी पत्नी व मुलाला देखभालीचा खर्च देण्यापासून सुटका होऊ शकत नाही, असे म्हणत दंडाधिकारी न्यायालयाने अंधेरीच्या एका महिलेला अंतरिम दिलासा दिलासा होता.