आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील यात्रेकरूंनी यंदा उत्तराखंडमध्ये विक्रमी गर्दी केली आहे. राज्यातून दररोज ८ हजार यात्रेकरू चारधामसाठी जात आहेत. ६ हजार यात्रेकरूंसह गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात्रेसाठी देशातून दररोज १२ हजार भाविक पोर्टलवर नोंदणी करतात. पण प्रत्यक्षात दररोज ३० ते ३५ हजार भाविक चारधामला जात आहेत. कोरोनानंतर येथे ऑक्टोबर २०२१ पासून नियमित तीर्थाटन सुरू झाले. नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंच्या गर्दीमुळे उत्तराखंडच्या यंत्रणेवर ताण वाढला आहे.
उत्तराखंडमध्ये रोज १० ते १२ हजार भाविकांची व्यवस्था होऊ शकते. त्याप्रमाणे २०१६ ते २०१९ पर्यंत दररोज १० ते १२ हजार भाविकांनी चारधाम यात्रा यशस्वीपणे केली होती. पण कोरोनामुळे मार्च २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंत भारत सरकारने तीर्थाटन आणि पर्यटन पूर्णत: बंद केले होते.
पाच-सहा राज्यांतूनच अधिक गर्दी होते
महाराष्ट्रातून रोज ८ हजार, गुजरातेतून ५ ते ६ हजार, मध्य प्रदेश ३ हजार, तेलंगण व आंध्र प्रदेशातून २ ते ३ हजार भाविक उत्तराखंडमध्ये येतात. नोंदणीकृत १२ हजार जणांऐवजी दररोज २५ ते ३० हजार भाविक येत आहेत.' -मंगेश कपुते, हेरंब ट्रॅव्हल्स
काश्मीरमध्येही पर्यटकांची गर्दी
यंदा १५ मेपर्यंत ७ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली . श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाममध्ये मोठी गर्दी झाली. आताही पर्यटक मोठ्या संख्येने आहेत. पूर्वी उन्हाळ्यातच अधिकचे पर्यटन होत असे. ३७० कलम हटवल्यामुळे आता वर्षभर येथे पर्यटकांची वर्दळ असते.' -जसवंत सिंग, अभ्यासक
दिव्य मराठी विशेष - २०१९ पर्यंत देशातून रोज १० हजार यात्रेकरू येत असत, आता ३५ हजार
...तर येतो दुप्पट खर्च
ज्यांनी आधीच चारधाम यात्रेची ऑनलाइन नोंदणी केलेली आहे, त्यांची बुकिंग कन्फर्म झालेली असते. त्यामुळे त्यांच्या पॅकेजमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ झालेली नाही. मात्र नोंदणी न करता यात्रेसाठी जे येतात, त्यांना दुप्पट-तिप्पट दराने निवास व्यवस्था घ्यावी लागते. त्यांच्यासाठी हॉटेल्स, ट्रॅव्हलिंगचे दरही दुप्पट झालेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.