आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Every Guest Going To The Janmabhoomi Will Have A Corona Test, While The Next Two Days Guests Will Not Be Allowed To Come To The Homes Of The Locals.

राम मंदिर भूमिपूजन:जन्मभूमीवर जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची होणार कोरोना टेस्ट, स्थानिक लोकांच्या घरांमध्ये पुढच्या दोन दिवसांपर्यंत पाहुण्यांना येण्यास बंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक लोकांना निर्देश देण्यात आले आहेत की, मंगळवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी परतावे, अन्यथा पीएम गेल्यानंतर अयोध्येत एंट्री मिळणार नाही

श्रीरामाची नगरी अयोध्या नटली आहे. आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतही सहभागी होणार आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान 12.30 वाजता भूमिपूजन करतील. हा कार्यक्रम 10 मिनिटे चालणार आहे.

जन्मभूमिवर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची होणार कोरोना टेस्ट

माहितीनुसार, जेव्हा पाहुणे पूजेमध्ये सहभागी होतील. तेव्हा त्यांना कोणालाही भेटायचे नाही. कोरोनाच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आह. यासोबतच कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्याची कोरोना टेस्टही करण्यात येणार आहे.

संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी परतावे, पाहुण्यांना बोलावण्यास बंद
संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी परतावे असे आवाहन अयोध्येतील लोकांना करण्यात आले आहे. तसेच पाहुण्यांना घरी बोलावण्यात बंदी घालण्यात आली आहे. दोन दिवस बाहेरच्या लोकांना येथे प्रवेश नसणार आहे. तसेच दीड किमी रस्त्यावरील 4 ते 5 मोहल्ल्यांमधील लोकांना संध्याकाळी घरात कैद राहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...