आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Every Second Person Investigating In Kolkata Disrupted !; 17 Times Patient In Bengal; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीच्या जाहीर सभा महागात पडल्या:कोलकातामध्ये तपासणी करणारी प्रत्येकी दुसरी व्यक्ती बाधित!; बंगालमध्ये रुग्ण 17 पट

कोलकाता21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाहीर सभांवर बंदी घाला अशी मागणी आम्ही तेव्हा केली हाेती - माजी पाेलिस महासंचालक विक्रम सिंह

संपूर्ण देशात कोरोनाची भयंकर लाट आहे. पश्चिम बंगालमधील स्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. राजधानी कोलकातामध्ये आरटीपीसीआर तपासणी करणारा प्रत्येकी दुसरा व्यक्ती महामारीने बाधित आढळून येत आहे. उर्वरित राज्यांत प्रत्येकी चारपैकी एक नमूना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. हे प्रमाण एका महिन्यात पाचपटीने वाढले आहे. कोलकाता व परिसरातील प्रयोगशाळांतील आकडे ४५ टक्के ५५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट सांगू लागल्या आहेत. राज्यातील दुसऱ्या भागात हे प्रमाण सुमारे २४ टक्के आहे.

महिन्याच्या सुरूवातीच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्क्यांनी जास्त आहे. एका सरकारी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट यापेक्षा जास्त आहे. लक्षण नसलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. असे लोक तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे. बंगालमध्ये ८ टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्चला झाले. सोमवारी ७ व्या आणि २९ एप्रिलला ८ व्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तृणमूलसह अनेक पक्षांनी अखेरच्या तीन टप्प्यांसाठी एकाचवेळी मतदानाची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोगाने ती नाकारली.

राजकीय पक्षांचा जीवाशी खेळ..
उत्तर प्रदेशचे माजी पाेलिस महासंचालक विक्रम सिंह म्हणाले, आम्ही एक महिन्यापूर्वी आयाेगाला नाेटीस पाठवली हाेती. बंगालमध्ये काेविड प्राेटाेकाॅलचे उल्लंघन केले जात आहे, असे निदर्शनास आणून दिले हाेते. जाहीर सभांवर बंदी घाला अशी मागणी आम्ही तेव्हा केली हाेती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयाेगाने याेग्यवेळी पावले उचलली असती तर ही वेळ आली नसती.

बातम्या आणखी आहेत...