आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • EWS Reservation | Three Issues Fixed, Hearing From 13, Will Examine The Validity Of The 103rd Amendment

ईडब्ल्यूएस आरक्षण:3 मुद्दे निश्चित, 13 सप्टेंबरपासून सुनावणी, 103 व्या घटनादुरुस्तीची वैधता तपासणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) राखीव जागा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर १३ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुरुवारी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने सुनावणीवेळी तीन मुद्दे निश्चित केले आहेत. अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या तीन मुद्द्यांवर सुनावणी करण्यास न्यायालयाने संमती दिली आहे. या तीन मुद्द्यांवर चर्चा करून योग्य निष्कर्ष काढता येईल, असे घटनापीठाने सांगितले.

या ३ मुद्द्यांवर सुनावणी

  • १०३ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सरकारला आर्थिक आधारावर आरक्षण बहाल करण्याचा अधिकार प्राप्त झाला. ही दुरुस्ती घटनेच्या मूळ चौकटीच्या विरोधात आहे का ?
  • या दुरुस्तीमुळे विनाअनुदानित शिक्षण संस्थांतील प्रवेशाचे नियम बनवण्याची मुभा मिळाली. त्यामुळेही ही दुरुस्ती घटनेच्या मूळ चौकटीचे उल्लंघन करणारी आहे का ?
  • गरिबांच्या आरक्षणात ओबीसी, एससी, एसटी यांचा समावेश नाही. त्याआधारे ही घटनादुरुस्ती मूळ चौकटीचे उल्लंघन करणारी आहे का ?
बातम्या आणखी आहेत...