आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ex CM Shettar Insists On Elections; Eshwarappa Said, Will Not Contest, Double Blow To BJP In The State

कर्नाटक निवडणूक 2023:माजी सीएम शेट्टर निवडणुकीवर ठाम; ईश्वरप्पा म्हणाले, लढवणार नाही, राज्यात भाजपला दुहेरी झटका

बंगळुरू /नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे ३८ दिवस उरले आहेत. यादरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांचा हा निर्णय भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या विरोधात आहे. यावेळी शेट्टर यांनी या वेळी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करावे,असे सर्वोच्च नेतृत्वाने त्यांना सांगितले होते. या उलट शेट्टर यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, मी निवडणूक लढवणार असून २५ हजार मतांच्या फरकाने विजयीही होणार आहे. अन्य एका घडामोडीत भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

नंदिनी दुधावरून वाद वाढला राज्यात दुधाचा वाद विकोपाला गेला आहे. अमूलच्या प्रवेशाबाबत काँग्रेस आणि जेडीएसने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडला आव्हान ठरवले आहे.सिद्धरामय्यांनी अमूल न खरेदी करण्याचे आवाहन केले.