आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना संकट आणि लॉकडाउनमध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखीलचा विवाह शुक्रवारी पार पडला. लॉकडाउनमुळे या लग्नात केवळ 50-60 अगदी जवळचे नातेवाइक सहभागी झाले होते. तत्पूर्वी कुमारस्वामी यांनी आपल्या समर्थक, मित्र आणि कार्यकर्त्यांसाठी एक संदेश जारी करून माफी मागितली. निखिल आणि रेवती यांचा विवाह 17 एप्रिल रोजी होण्याचे नियोजन झाले. आपण सर्वांनाच आमंत्रित करण्याची इच्छा होती, परंतु महामारीमुळे हे शक्य झाले नाही. अशात लॉकडाउनचे पालन करताना माझ्या मुलाला आणि सुनेला घरातूनच आशीर्वाद द्यावा असे आवाहन कुमारस्वामी यांनी केले.
कुमारस्वामी म्हणाले, ''लॉकडाउनमुळे बंगळुरूच्या फार्महाउसमध्ये लग्न करणे शक्य नव्हते आणि घरात पाहुण्यांची संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठिण आहे. मी माझ्या मुलाचा विवाह अगदी जल्लोषात करण्याचे नियोजन केले होते. परंतु, आता या लग्नात माझे भाऊ-बहीण आणि मोजके नातेवाइकच उपस्थित राहतील. पुन्हा एकदा मी आपण सर्वांची हात जोडून माफी मागतो. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर पुढे एखाद्या दिवशी मी मोठे रिसेप्शन देऊन सर्वांना बोलावणार आहे. सध्या आपल्याला लॉकडाउनच्या निर्देशांचे पालन करून इतरांसाठी उदाहरण प्रस्तुत करायचे आहे. हे माझे सौभाग्यच मानावे की लग्न रामनगर या नवीन जागी असलेले फार्महाऊस ग्रीन झोनमध्ये आहे. या ठिकाणी संक्रमणाची भीती कमी आहे.''
कोण आहेत निखील?
कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल अभिनयातून राजकारणात आला आहे. त्यांनी गेल्या वर्षी मंड्या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. आता त्यांचा विवाह कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते एम. कृष्णाप्पा यांची पणतू रेवती हिच्याशी झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.