आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • EX PM Manmohan Singh Rights A Letter To Prime Minister Narendra Modi Over COVID 19 Situation

मनमोहन सिंगांचे नरेंद्र मोदींना पत्र:अमेरिका आणि यूरोपने ज्या लसींना परवानगी दिली, त्यांना भारतातील लसीकरणात सामील करावे

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'भारतातील लसीकरणाचा वेग वाढवावा'

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. यात त्यांनी देशातील लसीकरणात वेग आणावा आणि परदेशात परवानगी मिळालेल्या लसींना भारतात आणावे, असे म्हटले आहे.

5 महत्वाचे सल्ले देताना मनमोहन म्हणाले की, ज्या लसींना यूरोप आणि अमेरिकेच्या मोठ्या आरोग्य संस्थांनी परवानगी दिली आहे, त्यांना कुठल्याही ट्रायलशिवाय भारतात आणावे आणि भारतातील लसीकरणाचा वेग वाढवावा.

मोदींना मनमोहन यांचा सल्ला

कोणत्या लस निर्मात्यांना किती लसींची ऑर्डर दिली आहे आणि पुढील सहा महिने याची काय स्थिती असेल, हे सरकारने सांगावे. येत्या सहा महिन्यात एका ठराविक लोकसंख्येपर्यंत लसीकरण करायचे ठरले असेल, तर त्यासाठी अॅडव्हान्समध्ये लसींची ऑर्डर द्यावी.

हा लसीकरणाचा कार्यक्रम कसा असेल आणि कोणत्या राज्याला किती लस दिली आहे, हेदेखील सरकारने सांगावे. सरकारने सर्व राज्यांना लसींचा 10 टक्के पुरवठा तात्काळ करावा आणि पुढील लसीकरणानुसार लस पुरवावी.

राज्यांना फ्रंटलाईन वर्कर ठरवण्यात थोडा वेळ द्यावा, म्हणझे 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सला लस देता येईल.

मागील काही दशताक भारत जगातील सर्वात मोठा लस निर्माता झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने लस तयार करणाऱ्या कंपन्यांना काही दिलासा द्यावा. मी असे वाचले आहे की, इस्रायलने कम्पल्सरी लायसेंस प्रोविजन लागू केला आहे. भारतानेही हा लागू करयला हवा.

बातम्या आणखी आहेत...