आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Examination Will Be Conducted In Isolation Room In Case Of Corona Symptoms, Complete Process Will Be Touch Free, Reporting Of Candidates At Different Times

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NEET UG साठी मार्गदर्शक सूचना:कोरोनाचे लक्षण असल्यास आयसोलेशन रुममध्ये घेतली जाणार परीक्षा, पूर्ण प्रोसेस टच फ्री असणार, कँडिटेट्सची वेगवेगळ्या वेळी रिपोर्टिंग

3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) यूजी 2020 साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एजेंसीकडून जारी करण्यात आलेल्या प्रोटोकॉलमध्ये सोशल डेस्टेंसिंगचे पालन करत जवळपास 15 लाख विद्यार्थी कशा प्रकारे परीक्षा देतील हे ठरवण्यात आले आहे.

जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, परीक्षेच्या आधी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षेच्या शेवटी असे परीक्षेचे तीन भाग केले गेले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया टच फ्री असेल. परीक्षा केंद्रात एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना रिपोर्टिंगसाठी टाइम स्लॉट देण्यात येईल. तसेच, सर्व कर्मचारी सदस्य आणि उमेदवारांचे तापमान देखील तपासले जाईल. यावेळी, जर एखाद्याला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर त्यांना एका स्वतंत्र खोलीत ठेवले जाईल.

तापमान तपासणी दोनदा होईल

परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर एका विद्यार्थ्याला सोडल्यानंतर दुसर्‍या विद्यार्थ्याला बोलावण्यात येईल. याशिवाय इतर कागदपत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये अ‍ॅडमिट कार्ड, सरकारी फोटो ओळखपत्र इत्यादी त्यात दाखवावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेस 15 ते 20 मिनिटे लागतील. यावेळी उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांना स्पर्श केला जाणार नाही. यानंतर, विद्यार्थ्याचे तापमान पुन्हा तपासले जाईल. त्याच वेळी, तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना खोलीचा क्रमांक आणि आसन सांगितले जाईल.

विद्यार्थ्यांनी या गोष्टींकडे ठेवावे लक्ष

 • तोंडावर मास्क आणि हातमोजे घालावे लागतील
 • पारदर्शी बॉटलमध्ये पिण्याचे पाणी आणता येईल.
 • चिटींग थांबवण्यासाठी मेटल डिटेक्टरने विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
 • 50 एमएलची पारदर्शी हँड सॅनिटायजरची बॉटल आणण्याची परवानगी असेल.
 • कोणत्याही प्रकारचे मेटलल इत्यादींनी बनवलेले प्रोडक्ट सोबत आणू नका.
 • मेटल डिटेक्टरने डायरेक्ट संपर्क न येताच केली जाईल तपासणी.
 • परीक्षेपूर्वी संबंदित दस्तावेज अॅडमिट कार्ड, सरकारी फोटो ओळखपत्र सोबत ठेवा.
 • शौचालयात जाण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक असेल.
 • हॉलमध्ये फिरणार नाही शिक्षक.

सामाजिक अंतर लक्षात घेता, परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये इनविजीलेटर फिरू शकणार नाही. ते दूरवर बसून नजर ठेवतील. याशिवाय वर्गातील केवळ 50 टक्के विद्यार्थी हजर असतील. ड्यूटीदरम्यान इनविजीलेटर किंवा टीचरची कोणत्याही प्रकारे मदत घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हात सॅनिटाइज करुन सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल.

परीक्षा हॉलमध्ये असेल व्यवस्था

 • परीक्षा केंद्राच्या भिंती, टेबल-खुर्ची, कॉम्यूटर, पंखे हे सर्व परीक्षा सुरू होण्यापूर्वी सॅनिटाइज केले जाईल.
 • कॉरिडोरमध्ये रुम नंबर मोठ्या अक्षरात लिहिले जातील. यामुळे विद्यार्थ्यांना वर्ग शोधताना त्रास होणार नाही.
 • परीक्षेदरम्यान पहिल्यांदाच लाउडस्पीकरचा वापर केला जाईल, या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुरूनच माहिती दिली जाऊ शकेल.
 • परीक्षा केंद्रात ब्लूटूथ, वाय-फायची तपासणी होईल, यानंतर एनटीए जॅमरचा प्रयोग करेल.