आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Excavations By Cement Companies Destroyed Many Caves, Most Of Which Were Made Of Limestone

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेघालय:सिमेंट कंपन्यांच्या उत्खननाने अनेक गुहा नष्ट, बहुतांश गुहा चुन्याच्या दगडांपासून तयार

जयंतिया हिल्स10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्खननामुळे चार सुंदर गुहा पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा

मेघालयाला निसर्गाने भरभरून दिले आहे. सुमारे १७०० हून जास्त गुहांची निर्मिती सुंदर चुना दगडांनी झाली आहे. या जगप्रसिद्ध गुहांनी सुमारे ३५१९ किमी क्षेत्रफळ व्यापलेले आहे. जगातील सर्वात माेठी वालुकाश्म गुहाही येथे आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सिमेंट कंपन्यांनी विनाशकारी चुना दगडाचे अमाप उत्खनन केले. त्याचा नैसर्गिक गुहा व पर्यावरणाला फटका बसला आहे. मेघालयात २९ वर्षांपूर्वी या गुहांचा शोध घेण्याचे काम करणारे ब्रायन डेली म्हणाले, उत्खननामुळे चार सुंदर गुहा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. सिमेंट कारखान्यांतून निघणाऱ्या आणि पुनर्वापर होऊ न शकणाऱ्या कचऱ्यामुळे थंडीत लुखा नदीचे पाणी गडद निळ्या रंगाचे होते.

मेघालयातील पर्यावरण संशोधकांच्या ताज्या अहवालानुसार जयंतिया हिल्स जिल्ह्यात सिमेंट कंपन्यांद्वारे व्यापक प्रमाणात चुना दगडांच्या उत्खननामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम झाल्याचे समोर येत आहे. मार्टिन ल्यूथर ख्रिश्चन विद्यापीठाचे डॉ. आर. यूजीने लामारे व नॉर्थ-ईस्टर्न हिल्स विद्यापीठात पर्यावरण अभ्यास विभागाचे प्रोफेसर आे.पी. सिंह यांनी शोधप्रबंधात मेघालयातील लाइमस्टोन उत्खनन क्षेत्रातील मातीची गुणवत्ता आणि त्यात होणाऱ्या बदलाचा उल्लेख करण्यात आला आहे.

नेचर या आंतरराष्ट्रीय त्रैमासिकात मेघालयातील माती परीक्षणाबद्दचा संशोधनपर लेख प्रकाशित झाला आहे. त्यात उत्खननाबरोबरच वनक्षेत्राची कापणी, जैवविविधतेची हानी, पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता, ध्वनिप्रदूषण, मातीची धूप इत्यादी पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचा इशारा देण्यात आला. शोधप्रबंधात पर्यावरणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चुना असलेल्या क्षेत्रातील मातीच्या गुणवत्तेत घट झाल्याचे जास्त उत्खनन झालेल्या भागात दिसून आले. जयंतिया हिल्स जिल्ह्यात आठहून जास्त सिमेंट उद्योग आहेत. माती नमुन्यांतील आर्द्रतेचे प्रमाण, जलधारण क्षमता, जैविक कार्बन व एकूण नायट्रोजन इत्यादी घटकांत उल्लेखनीय घट झाली आहे.

जम्मू-काश्मीरचे लोकही घाबरले
उत्तराखंडमधील आपत्तीनंतर जम्मू-काश्मीरमधील लोक दहशतीखाली आहेत. जलविद्युत प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मनात ही भीती दिसते. चमोलीसारखी शिखरे, हिमनद्या आणि धरणे फुटून संकट आेढावू नये, असे लोकांना वाटते. कारण जम्मू-काश्मीरमध्येही मोठ्या प्रमाणात जलविद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. त्याद्वारे देशभरात वीज पुरवठा केला जातो. राज्यात २० हजार मेगावॉट वीज निर्मिती क्षमता आहे. सध्या ३५०० मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे.

उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मेघालयातील बेकायदा उत्खननावरून चिंता वाढली आहे. या क्षेत्राचा अभ्यास करणारे डॉ. लामारे म्हणाले, चुना दगडांचे सातत्याने उत्खनन होत आहे. हे दुर्दैवी आहे. त्यामुळे येथील पर्यावरणात सुधारणा होताना दिसत नाही. मेघालयातील विद्यार्थी संघ व मेघालय विधानसभा पर्यावरण समितीने देखील लुखा नदीच्या बदलल्या रंगाचे वैज्ञानिक तपासणी केली जावी, अशी मागणी केली आहे.

प्रदूषणास सिमेंट कंपन्या जबाबदार : स्थानिक
मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील चंद्र व लुखा नदीमधील प्रदूषणासाठी सिमेंट कंपन्या दोषी असल्याचे स्थानिक लोकांना वाटते. दरवर्षी एका नव्या गुहेचा शोध घेणारे खारप्रान म्हणाले, या चुना दगडांच्या उत्खननामुळे क्रेम मालो, क्रेम उमकसेह, क्रेम उमखांग, खारसनीयंग, क्रेम, उमलावनसारख्या चार सुंदर गुहा आता नामशेष झाल्या आहेत. चुन्याच्या येथील शिळा कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या आहेत. जागतिक विक्रम करणारी २४.५ किमी लांबीची गुहाही येथे आहे. तेथे चुन्याच्या शिळांचे उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...