आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्तीसगडमधील व्यावसायिकांच्या एका गटाने (सिंडिकेट) अबकारी प्रकरणांमध्ये सुमारे २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दावा ईडीने केला आहे. व्यापारी अन्वर ढेबरची ४ दिवसांची कोठडी घेतल्यानंतर ईडीने सांगितले की, या सिंडिकेटने २०१९ ते २०२२ पर्यंत छत्तीसगडमध्ये काम केले आणि कमिशन घेतले. दुसरीकडे, ईडीने रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांची रविवारी पुन्हा चौकशी केली.
छत्तीसगडमध्ये ईडीने उत्पादन शुल्क विभाग व दारूच्या पुरवठ्याचा तपास सुरू केला आहे. शनिवारी व्यापारी अन्वरच्या अटकेनंतर ईडीने दावा केला की, सिंडिकेट डिस्टिलरीजमध्ये नोंदी न करता थेट सरकारी दारूच्या दुकानांमध्ये दारूची वाहतूक आणि विक्री करते. ईडीच्या म्हणण्यानुसार, राज्यात ८०० दारूची दुकाने आहेत, जिथे सरकारकडून दारूचा पुरवठा केला जातो. मात्र या दुकानांमध्ये बनावट होलोग्राम आदींचा वापर करून सिंडिकेट अवैध दारू खपवत होते.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले
ईडीने छत्तीसगडमधील उत्पादन शुल्क विभागाच्या डझनभर अधिकाऱ्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले. यात अबकारी भवन म्हणजेच संचालनालयाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त काही जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारीदेखील आहेत, ज्यांची २०१९ ते २०२२ दरम्यान, काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी काही अधिकाऱ्यांना ईडीने गेल्या १० दिवसांत एक-दोनदा बोलावून चौकशी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.