आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sakinaka Rape Case Update | Execution Of Three Persons On The Same Day | Brutal Murder Of A Woman By Torture, Cases Spread All Over The Country

साकीनाका-सोलापूर अत्याचार प्रकरण:एकाच दिवशी तिघांना फाशी; अत्याचार करुन महिलेचा निर्घृण खून, देशभरात गाजले प्रकरण

मुंबई/सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या निर्भया अत्याचार प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या मुंबईच्या साकीनाका येथील महिलेवर बलात्कार व हत्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावली, तर सोलापुरातील अवघ्या १६ महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी सोलापूर सत्र न्यायालयाने आरोपी पती-पत्नीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

मुंदिल्लीच्या निर्भया अत्याचार प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आरोपी मोहन चौहानला अखेर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दिंडोशी सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वाचा निकाल दिला. सत्र न्यायालयाने अवघ्या नऊ महिन्यांत हा निकाल दिला. आरोपी मोहन चौहानने सप्टेंबर महिन्यात पीडितेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

सेफ सिटी इंडेक्स (२०२१) मध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत बलात्कार आणि अत्याचार झालेल्या महिलेचा तब्बल ३० तासांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला होता. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने जबर वार केले होते. पीडित महिलेवर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करत केवळ एका वर्षात निकाल लावण्यात आला आहे.

काय आहे घटना? : गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. १० सप्टेंबर २०२१ च्या मध्यरात्री एक ३२ वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी पडली होती. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही ११ सप्टेंबर रोजी तिने आपले प्राण सोडले. या घटनेनंतर काही तासांच्या आतच मुंबई पोलिसांकडून आरोपी मोहन चौहानला अटक केली होती. मोहनवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बलात्कार, हत्या, अॅट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. अवघ्या १८ दिवसांत मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सोलापूर : १६ महिन्यांच्या चिमुकलीवर पित्याचा अत्याचार, आईने केली हत्या
३ जाने. २२ रोजी गुन्हा; २ जून रोजी न्यायालयाने ठाेठावली शिक्षा

सोलापूर | अवघ्या १६ महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणात दोषी आढळलेल्या पती-पत्नी दोघांनाही सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी (विशेष न्यायाधीश, बाललैंगिक अत्याचार) यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी धोलाराम अर्जुनराम बिष्णोई (२६), त्याची पत्नी पुनीकुमारी धोलाराम बिष्णोई (२०) (दोघे रा. आरएलनगर, हैदराबाद तेलंगण, मूळ गाव बारासण, जि. बाडमेर, राजस्थान) अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावेे आहेत. ३ जानेवारी २०२२ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी निर्भया (१६ महिने) हिच्यावर आरोपी धोलारामने दारू पाजून नैसर्गिक, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. यामुळे वेदनेने रडत असताना मुलीचा आवाज बंद करण्यासाठी पत्नी पुनीकुमारीने तिच्या ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून तिचा खून केला.

सरकार पक्षातर्फे ३१ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा, डीएनए अहवाल सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी न्यायालयात सादर केला. हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. आरोपींच्या वतीने अॅड. संदीप शेंडगे, अॅड. फिरोज शेख, अॅड. अंजली बाबरे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक अमोल गवळी, उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, नाईक देवानंद क्षीरसागर यांनी केला. कॉन्स्टेबल डी. बी. वाघमारे, एस. व्ही. साळवी, डी. वाय. कोळी यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...