आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीयांच्या विदेशातील खर्चावर आरबीआयने एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार २०२२-२३ च्या सुरुवातीच्या ९ महिन्यांतच विदेशात भटकंती करण्यासाठी एकूण ८१,५०८ कोटी रु. पाठवण्यात आले. ही रक्कम २०२१-२२ च्या सर्व १२ महिन्यांच्या तुलनेत ४४% जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम प्री-कोविड पातळी, म्हणजेच २०१९ च्या तुलनेतही १०७% जास्त आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे विदेशात शिक्षणासाठी पाठवला जाणारा पैसा एका वर्षातच ५०% घटला आहे. प्री-कोविड पातळीच्या तुलनेतही २८% कमी पैसा पाठवण्यात आला. याचा अर्थ विदेशात जाणारे विद्यार्थी घटले किंवा त्यांच्या शिक्षणाचा खर्च घटला असा होत नाही, तर कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना भारतात परत यावे लागले. अजूनही हजारो विद्यार्थी भारतात राहूनच विदेशी संस्थांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. महागाई, व्याजदर वाढल्याने विकसित देशांत नोकऱ्यांची शक्यताही कमी झाली आहे.
विदेशी शेअर बाजारांत गुंतवणूक घटली
२०२२-२३ च्या पहिल्या नऊ १ वर्षात २०१९
महिन्यांत विदेशात गेली रक्कम वाढ/घट नंतर फरक
हिंडणे-फिरणे ८१,५०८ +४४% +१०७%
शिक्षणासाठी २१,००७ -५०% -२८%
बँकांमध्ये ठेवी ५,५९७ -१८% +५०%
जमीन खरेदीसाठी १,०२२ +११% +४७%
इक्विटी/डेट गुंतवणूक २,५११ -५९% -२७%
उपचारासाठी २९३ -६% +२५%
मात्र, शैक्षणिक कर्ज नव्या उंचीवर
केंद्र सरकारकडून लोकसभेत दिलेल्या एक उत्तरानुसार २०२१-२२ मध्ये शैक्षणिक कर्ज वार्षिक आधारे ६८.२% वाढून ७,५७६ कोटी झाले आहे. ते एक वर्षापूर्वी ४,५०३ कोटी रुपये होते. सोबतच भारतीय बँकांच्या लोन पोर्टफोलिओमध्ये शैक्षणिक कर्जाची भागीदारी ५०% पर्यंत पोहोचली आहे. ती गेल्या वर्षी केवळ २६ टक्के होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.