आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Expert Advice This Is The Right Time To Prepare Hard To Stop The Third Wave Of Corona

रुग्णसंख्येत घट होताच तज्ज्ञांचा सल्ला:कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी भक्कम तयारी करण्याची हीच योग्य वेळ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 70% लोकांना लस दिल्यावर उर्वरित 30% सुरक्षित राहतील
  • डिसेंबरपर्यंत कार्यक्रमांना मंजुरी देण्याची चूक राज्यांनी करू नये

शहरांत कोरोना संसर्गाचा पीक येऊन गेला. गावांतील स्थितीचा अंदाज लावणे थोडे कठीण आहे. पण शहरांप्रमाणेच गावांतीलही स्थिती सुधारेल हे निश्चित. संसर्ग संपला आहे असे लोकांनी जानेवारीत स्वत:च मानले, त्यामुळे भारताची आज ही स्थिती झाली. आरोग्य व्यवस्थेत काही त्रुटी होत्या. प्रत्येक स्तरावर कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले. मोठे कार्यक्रम होऊ लागले. प्रचार सभा, कुंभमेळ्यासारखे धार्मिक कार्यक्रम, पर्यटन यामुळे विषाणूच्या नव्या व्हेरियंटचा जन्म झाला. देशात वेगाने संसर्गाची दुसरी लाट आली. आज स्थिती सर्वांसमोर आहे. आता प्रश्न असा आहे की, पुढे काय होणार? तिसरी लाट येणार का? तर उत्तर आहे-जर गर्दी असलेलेे कार्यक्रम झाले आणि सर्व काही खुले केले तर ती निश्चितच येणार. राज्य सरकारांनी किमान डिसेंबरपर्यंत गर्दी असलेल्या कार्यक्रमांना मंजुरी देण्याची चूक करू नये.

अनेक राज्यांनी वेगवेगळ्या स्तराचे लॉकडाऊन लावले आहेत. हे निर्बंध एकदम मागे घेऊ नयेत. उदाहरणार्थ- आवश्यक साहित्याची दुकाने खुली करू शकता, पण मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम बंदच ठेवावेत. फिजिकल डिस्टन्सिंग कायम राहावे यासाठी शक्य असेल तर कलम १४४ लागू करू शकता. शक्य असेल तर रेल्वे, बस, विमानांची संख्या सध्या काही महिने मर्यादितच ठेवली जावी.-डॉ. के. श्रीनाथ रेड्‌डी, कोविड-१९ नॅशनल टास्क फोर्स

  • केवळ लॉकडाऊनमुळे नव्हे, व्यावहारिक विचार केला तर संसर्ग थांबेल

बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, तामिळनाडू आणि ईशान्येत संसर्ग उशिरा झाला. त्यामुळे तेथे काही दिवस पॉझिटिव्हिटी दर काही दिवस राहील. तो लॉकडाऊन किंवा इतर निर्बंधांमुळे कमी होणार नाही. कारण, लॉकडाऊन साथरोग पसरू नये म्हणून उपयोगी ठरते, तो कमी करत नाही. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी जेंव्हा भारतात लॉकडाऊन झाले त्यानंतर कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले. मात्र, ते कमी होऊ लागले तेव्हा बाजारपेठा उघडल्या होत्या. म्हणजे, लॉकडाऊन लावा किंवा न लावा, हा दर आपोआपच कमी होत जाईल. याचा थेट संबंध लोक किती काळजी घेतात, याच्याशी आहे. कोविड प्रोटोकॉल पाळला असता तर देशात दुसरी लाटही आली नसती. यापुढेही मास्कचा काटेकोरपणे वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंग हे उपाय संसर्ग थांबवू शकतात.-डॉ. जुगलकिशोर,आरोग्यविषयक तज्ज्ञ

  • ७०% लोकांना लस दिल्यावर उर्वरित ३०% सुरक्षित राहतील

सध्या रोज अडीच लाखांवर नवे रुग्ण आढळत आहेत. पहिल्या लाटेत विषाणूचा फक्त एक व्हेरियंट होता. जानेवारीनंतर विषाणूने स्वरूप बदलणे सुरू केले. तो बहुरूपी झाल्याने दुसरी लाट आली. आपण असे म्हणू शकतो की, पहिल्या लाटेत एका घरात एखाद्याला संसर्ग झाला तरी काही जण वाचत होते, पण या वेळी विषाणू ज्या घरात घुसला त्यातील प्रत्येक सदस्य संक्रमित झाला. त्यांची संक्रामक शक्ती आधीपेक्षा अनेक पट आहे. सध्या जगात कोरोनाचा सर्वात भयावह व्हेरियंट बी.६१७ आहे, तो सर्वात आधी भारतात आढळला होता. आता रुग्णसंख्या घटण्याची दोन मोठी कारणे आहेत. पहिले- देशातील ८०% शहरांत लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे संसर्गाचा फैलाव बऱ्याच मर्यादेपर्यंत थांबला आहे. दुसरे- एका निश्चित काळानंतर संसर्गाचा पीक येतोच, तो आला आहे. म्हणजे लॉकडाऊनने संसर्गाची साखळी तोडली आहे. विज्ञान असे सांगते की, जेव्हा एखाद्या ठिकाणी ६०-७०% लोकसंख्येचे लसीकरण होते तेव्हा उर्वरित ३०% लोकांना संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे काही देशांत मास्क आता अनिवार्य नाही, असे वृत्त तेथून येत आहे. भारतातही हे शक्य आहे. पण आपली समस्या ही आहे की, १४% पेक्षाही कमी लोकांनाच पहिला डोस देण्यात आला आहे. जोपर्यंत ७०% लोकांना लस दिली जात नाही तोपर्यंत मास्कपासून सूट मिळणे अशक्य आहे.-डॉ. नरेंद्र अरोरा,एक्स्पर्ट अॅडव्हायझरी ग्रुपचे प्रमुख

दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील - लवकर लस घ्या, कोविड प्रोटोकॉल पाळा
आता या संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. एक म्हणजे लवकरात लवकर लस घ्यावी लागेल आणि दुसरी म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळले पाहिजेत.

शाळा सुरू करता याव्यात यासाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांनाही आधी लस दिली जावी
मुले तर एकमेकांना संसर्ग पसरवू शकतात, पण त्यांना मोठ्यांपासून जास्त धोका आहे. सर्व शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली तर शाळा उघडण्याबाबत विचार होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...