आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Explosives Found In Large Quantities At Jammu Bus Stand; There Was A Conspiracy To Shake Jammu On The Second Anniversary Of Pulwama Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

J&K मध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला:जम्मू बस स्टँडवर 6 किलो स्फोटकं जप्त, पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतीदिनी जम्मूमध्ये हल्ला करण्याचा होता कट

जम्मू11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या आठवड्यात दोन दहशतवाद्यांना झाली होती अटक

पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्या स्मृतीदिनी सुरक्षादलाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. जम्मू बस स्टँडवरुन सुरक्षादलाने 6 किलो इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) जप्त केले आहेत. सुरक्षादलाने संपूर्ण बस स्टँडवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. अधिकाऱ्यांनुसार, दहशतवादी पुलवामाच्या दुसऱ्या वर्षपुर्तीवर मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत होते.

संध्याकाळी IG प्रेस कॉन्फ्रेंस घेणार
जम्मू पोलिसांनी संध्याकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यामध्ये जम्मूचे IG मुकेश सिंह माहिती देतील. पत्रकार परिषदेमध्ये पोलिस बस स्टँडवर मिळालेले विस्फोटक आणि दहशतवाद्यांच्या कटाचा खुलासा करु शकतात.

गेल्या आठवड्यात दोन दहशतवाद्यांना झाली होती अटक
द रेजिस्टेंट फ्रंट (TRF)शी संबंध असलेले दहशतवादी अहमद राथेड याला शनिवारी 13 फेब्रुवारीला सांबा येथून अटक करण्यात आली होती. राथेट काश्मीरमध्ये भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्याच्या प्रयत्नात होता. 6 फेब्रुवारीला लष्कर-ए-तोयबाचे कमांडर हिदायतुल्ला मलिक उर्फ हसनैन याला जम्मूच्या कुंजवानीमधून अटक करण्यात आली होती.

दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच झाला होता पुलवामा हल्ला
14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये तहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने CRPF च्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये एक बस बॉम्बने उडवण्यात आली होती. हल्ल्यामध्ये CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. जैशने पाकिस्तानची गुप्त एजेंसी ISI सोबत मिळून कट रचला होता. NIA ने 19 लोकांना या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोपी बनवले होते, ज्यामध्ये 6 जणांना सैन्याने चकमकीत मारले होते.

हल्ल्याच्या उत्तरात एअरफोर्सने बालाकोट एअरस्ट्राइक केली होती
पुलावामा हल्ल्याच्या 12 दिवसांच्या आतच इंडियन एअरपोर्सने शहीद जवानांचा सूड घेतला होता. एअरफोर्सने बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करुन दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. या कारवाईमध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो.