आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मूच्या डांगरी गावात सोमवारी शोकाकुल वातावरण होते. चार गावकऱ्यांच्या मृत्यूनंतर लोकांच्या डोळ्यात पाणी होते आणि पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप. डांगरीचे सरपंच धीरज शर्मा यांनी सांगितले की, या क्षेत्रात ग्राम सुरक्षा समिती (व्हीडीसी) होती. मात्र पोलिसांनी ६० वर्षांहून जास्त वयाच्या लोकांकडून शस्त्रे परत घेतली. ती शस्त्रे पुन्हा दिली नाहीत. व्हीडीसीच्या लोकांकडे शस्त्रे असती तर रविवारी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळाले असते. शर्मा म्हणाले की, पाकिस्तानची कृत्ये थांबणार नाहीत. अशा वेळी लोक स्व संरक्षणार्थ शस्त्र उचलण्यासाठी तयार आहेत.
पाकिस्तानचे द्वेष पसरवण्याचे षड््यंत्र कधीच यशस्वी होणार नाही. महामार्गावर बसलेल्या लोकांमध्ये दहशतवाद्यांची भीती नाही, तर राग झळकत होता. लोकांमध्ये जिल्हा प्रशासन आणि पोलिसांप्रतिही संताप आहे. त्यांनी आरोप केला की, संपूर्ण परिसरात शोध अभियान न राबवल्यामुळे सोमवारी स्फोट झाला. राजौरी महापालिकेचे उपाध्यक्ष भारत भूषण यांनीही ग्राम सुरक्षा समितीला शस्त्रे देण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी राजौरी बंददरम्यान राजौरी-पूंछ राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह ठेवून लोकांनी निदर्शने केली. जास्तीची सुरक्षा आणि टार्गेटेड किलिंगच्या विरोधांत गावकऱ्यांचे म्हणणे होते की, घटना थांबायचे नाव घेत नाहीत. लोकांच्या मागणीनंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा सायंकाळी उशिरा घटनास्थळी आले.
बालांच्या बंदुकीने गावाला वाचवले
डांगरीचे गावकरी बाला यांनी त्यांच्या बंदुकीने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी पसार झाले. पोलिस अधिकारी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, आता ग्राम रक्षा समितीकडून बंदुका परत घेणार नाहीत.
जम्मू : हिंदूंच्या घरांवर गोळीबारानंतर स्फोटके पेरून गेले दहशतवादी; दुसऱ्या दिवशी स्फोट, २ मुले ठार
जम्मू | राजौरीच्या डांगरी गावात रविवारी ज्या हिंदू घरांवर गोळीबार झाला तेथे दहशतवादी जाताना स्फोटके पेरून गेले. सोमवारी सकाळी त्यांचा स्फोट झाला. रविवारी रात्री ठार झालेल्या दीपकच्या (२३) घरी हा स्फोट झाला. त्यात ४ वर्षीय विहान व १६ वर्षीय समीक्षाचा मृत्यू झाला. इतर ६ जण जखमी झाले. गावातील रमेशकुमार यांनी सांगितले की, दीपकचा मृतदेह अॅम्ब्युलन्सने रस्त्यावर आणण्यात येत होता. त्या वेळी दीपकच्या घरी काही महिला व मुलेच होती. दीपकला नुकतीच शासकीय नोकरी मिळाली होती. दरम्यान, आणखी एक स्फोटक निकामी करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.