आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचलमध्ये भारत-चीनची झडप:सीमा वादामुळे आमने-सामने आले दोन्ही देशांचे सैनिक, LAC वर 200 चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी रोखले

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्टमध्ये 100 चिनी सैनिक उत्तराखंडमध्ये दाखल झाले होते

केवळ लडाखमध्येच नाही तर अरुणाचल प्रदेशातही चीनच्या कुरापती अजुनही सुरुच आहेत. गेल्या आठवड्यात अरुणाचल सेक्टरमध्ये भारतीय सैनिक चिनी सैनिकांशी भिडले होते. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. यानुसार, दोन्ही देशांचे सैनिक गस्तीदरम्यान सीमेच्या वादावरून समोरासमोर आले होते आणि ही प्रक्रिया काही तास चालली होती. यामध्ये भारतीय सैनिकांचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि प्रोटोकॉलनुसार चर्चेद्वारे वाद मिटवण्यात आला.

मीडिया रिपोर्टनुसार, 200 चिनी सैनिक अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तिबेटमधून भारतीय सीमेमध्ये घुसले होते, त्यांना भारतीय सैनिकांनी रोखले. लडाखमध्ये चिनी घुसखोरी आणि भारतीय जवानांसोबत चकमकी झाल्याच्या बातम्या येत राहतात, परंतु अरुणाचल प्रदेशमध्ये चकमकीच्या बातम्या बऱ्याच काळानंतर आल्या आहेत. यावरुन स्पष्टपणे दिसते की चीनने अरुणाचलमध्ये आपल्या हालचाली पुन्हा वाढवल्या ​​आहेत.

चीन अरुणाचलमध्ये घुसखोरी करत आहे
सुमारे 9 महिन्यांपूर्वी एका मीडिया रिपोर्टने दावा केला होता की चीनने भारतीय सीमेपासून साडेचार किलोमीटर अंतरावर अरुणाचलमध्ये एक गाव वसवले आहे. त्यात 100 हून अधिक घरे बनवण्यात आली आहेत. हे गाव सुबनसिरी जिल्ह्यातील सारी चु नदीच्या काठावर वसलेले आहे. वास्तविक नियंत्रण रेषेजवळील हा परिसर आहे. याचे फोटोज अमेरिकास्थित इमेजिंग कंपनी प्लॅनेट लॅब्सने प्रसिद्ध केली होती.

ऑगस्टमध्ये 100 चिनी सैनिक उत्तराखंडमध्ये दाखल झाले होते
अलीकडेच, बातमी आली होती की 30 ऑगस्ट रोजी 100 चिनी सैनिकांनी उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये घुसखोरी केली होती आणि तेथे 3 तास थांबल्यानंतर ते परत आले. मीडिया रिपोर्टनुसार, घोड्यांवर आलेल्या चिनी सैनिकांनी भारतीय सीमेमध्ये प्रवेश केला आणि तोडफोड केली, तसेच एक पुलही तोडला. बाराहोटी हा तोच भाग आहे जिथे 1962 च्या युद्धापूर्वीही चीनने घुसखोरी केली होती.
0
पूर्व लडाखमधील LAC जवळ तात्पुरती बांधकामेही करण्यात आली
दोन आठवड्यांपूर्वी असे वृत्त आले होते की चीनने पूर्व लडाखमध्ये (LAC) जवळील सुमारे 8 ठिकाणी तात्पुरत्या तंबूसारखी निवास व्यवस्था केली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने काराकोरम खिंडीजवळील वहाब जिल्गापासून पियू, हॉट स्प्रिंग्स, चांग ला, ताशीगोंग, मांजा आणि चुरूप या उत्तर भागात आश्रयस्थान बांधले आहेत. येथे प्रत्येक ठिकाणी सात क्लस्टरमध्ये 80 ते 84 कंटेनर बनवले गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...