आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Facebook CEO Mark Zuckerberg Planning To Change Company Name| All You Need To Know

बदलाच्या दिशेने फेसबुक:स्वतःला रिब्रांड करण्याच्या तयारीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, नावामध्येही केला जाऊ शकतो बदल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेटावर्स तयार होण्यास 15 वर्षे लागतील

येत्या काही दिवसांमध्ये फेसबुक त्याचे नाव बदलू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुक मेटावर्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे कंपनी त्याच्या नवीन नावाची पुढील घोषणा करू शकते. मात्र, कंपनीने याबाबत अजून काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

कंपनीच्या अॅन्यूअल कनेक्ट कॉन्फ्रेंसमध्ये होऊ शकते नावाची घोषणा
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग कंपनीच्या अॅन्यूअल कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नवीन नावाची घोषणा करू शकतात. कंपनीला हे करायचे आहे कारण फेसबुक सीईओला वाटते की, कंपनीला पुढच्या काही वर्षांमध्ये लोकांनी मेटावर्स कंपनी म्हणून ओळखावे.

एकाच ठिकाणी मिळतील अनेक सुविधा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बदलाच्या माध्यमातून कंपनी आपले सर्व अॅप इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि ओकुलसला एकाच ठिकाणी आणण्याची योजना आखत आहे. मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच जाहीर केले की आम्ही एका सोशल मीडिया कंपनीमधून 'मेटावर्स' कंपनीकडे जात आहोत आणि 'एम्बॉइडेड इंटरनेट' वर काम करू. ज्यात रियालिटी आणि व्हर्चुअल वर्ल्डचे संयोजन पूर्वीपेक्षा अधिक असेल. यामुळे मीटिंग, बाहेर फिरणे, गेमिंगसारखे अनेक काम केले जाऊ शकतील.

यापूर्वीही अनेक कंपन्यांनी केले आहेत बदल
स्वतःचे नाव बदलणारी किंवा रिब्रांड करणारी फेसबुक ही पहिली कंपनी नाही. याआधी 2015 मध्ये गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने गुगलला केवळ सर्च इंजिनच बनवू नये यासाठी अनेक महत्त्वाचे बदल केले. तसेच 2016 मध्ये स्नैपइंकचे नाव बदलून स्नॅपचॅट करण्यात आले.

मेटावर्स डेव्हलपमेंटसाठी फेसबुक 10 हजार लोक हायर करणार
कंपनीने आपल्या मेटावर्स डेव्हलपमेंटसाठी यूरोपीय यूनियन (UN) चे 10 हजार लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले की, ते व्हर्चुअल रियलटी वर्ल्डसाठी एक्सपीरियंस डेव्हलपमेंटसाठी पाच वर्षात मोठ्या प्रमाणात भरती करतील. या नोकऱ्या फ्रान्स, जर्मनी, आयरलँड, इटली, नीदरलँड, पोलँड आणि स्पेनसह इतर देशांसाठी असतील.

मार्क झुकेरबर्ग यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की त्यांची कंपनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पुढे जाऊन 'मेटावर्स' कंपनी बनेल. फेसबुक एक ऑनलाइन जग निर्माण करत आहे जिथे लोक VR (व्हर्चुअल रियलिटी) हेडसेटचा वापर करुन व्हर्चुअल एनवायरमेंटमध्ये गेम, वर्क आणि कम्युनिकेशन करु शकतील.

मेटावर्स काय आहे?
त्याला आभासी वास्तवाचा पुढील स्तर म्हणता येईल. ज्याप्रमाणे लोकांनी ऑडिओ स्पीकर्स, टेलिव्हिजन, व्हिडीओ गेम्ससाठी व्हर्चुअल रियलिटी टेक्नॉलॉजीला डेव्हलप केले आहे. म्हणजेच तुम्ही अशा गोष्टी पाहू शकतात ज्या तुमच्या समोर नाहीच. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या अडव्हान्स व्हर्जनने वस्तूंना स्पर्श करणे आणि स्मेलची जाणिव केली जाऊ शकेल. यालाच मेटाव्हर्स म्हटले जाते. मेटाव्हर्स शब्दाचा सर्वात पहिले वापर सायन्स फिक्शन लेखल नील स्टीफेन्सन यांनी 1992 मध्ये आपल्या नोबेल 'स्नो क्रैश' मध्ये केला होता.

मेटावर्सचा फायदा कोणाला होईल?
जर एखाद्या व्यक्तीने अॅपल, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या टेक कंपन्यांचा खूप अभ्यास केला तर त्याला जाणवेल की तांत्रिक फायदे अपरिहार्य आहेत. मेटावर्स या वर्गात मोडतो. या तंत्रज्ञानाचा आपल्या समाजावर, राजकारणावर आणि संस्कृतीवर काय परिणाम होईल याचा विचार करणे आपण थांबवू शकत नाही.

मेटावर्स तयार होण्यास 15 वर्षे लागतील
फेसबुकने म्हटले आहे की, मेटावर्स ही एक कंपनी नाही जी एका रात्रीत बांधली जाऊ शकते. मेटावर्सच्या डेव्हलपमेंटसाठी काही नॉन प्रॉफिट ग्रुप्सने 50 मिलियन डॉलर (जवळपास 376 कोटी रुपये) ची फंडिंग केली आहे. खरे तर हे तयार होण्यात 10 ते 15 वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र काही समीक्षकांचे म्हणणे आहे की कंपनीने अलीकडच्या काही महिन्यांतील घोटाळ्यांपासून लक्ष हटवण्यासाठी हे डिझाइन केले आहे.

फेसबुकची कॉर्क आयर्लंडमध्ये एक रियलिटी प्रयोगशाळा आहे. त्यांनी फ्रान्समध्ये AI (ऑगमेंटेड रियल्टी) संशोधन प्रयोगशाळा उघडली आहे. 2019 मध्ये, फेसबुकने म्युनिकच्या तंत्रज्ञान विद्यापीठाशी एआय एथिकल रिसर्च सेंटर तयार करण्यासाठी भागीदारी केली. येत्या 5 वर्षात कंपनी ज्या लोकांना रोजगार देईल त्यात अत्यंत विशेष अभियंत्यांचा समावेश असेल.

बातम्या आणखी आहेत...