आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Facebook Fake Account Updates: Facebook Had Plans To Delete Fake Accounts In India; But The BJP MP Withdrew; News And Live Updates

दावा:फेसबुकची भारतात बनावट खाती हटवण्याची योजना होती; पण भाजप खासदारामुळे माघार

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप-काँग्रेसच्या समर्थनार्थ काम करत होते दोन-दोन नेटवर्क

फेसबुकने भारतात बनावट खाती हटवण्याची योजना तयार केली होती; पण यात एक भाजप खासदार थेट सहभागी असल्याचे पुरावे आढळले, तेव्हा कंपनीने माघार घेतली. फेसबुकच्या एक माजी डेटा सायंटिस्ट सोफी झांग यांनी हा दावा केला आहे. ‘द गार्डियन’मधील वृत्तानुसार, झांग यांनी म्हटले आहे की, ‘भारतात जवळपास सर्व राजकीय पक्ष फेक लाइक्स, शेअर्स, कमेंट्सची व्यवस्था करतात. मी डिसेंबर २०१९ मध्ये संशयित फेसबुक खाती असलेल्या चार नेटवर्कचा शोध घेतला होता. त्याद्वारे बनावट लाइक्स, शेअर्स, कमेंट्स आणि रिअॅक्शन्सचा प्रसार केला जात होता.

त्यापैकी दोन-दोन नेटवर्क भाजप व काँग्रेसच्या समर्थनार्थ काम करत होते. फेसबुकच्या चेकपॉइंट प्रणालीद्वारे भाजप खासदाराच्या सहभागाची माहिती मिळाली. ही प्रणाली युजरला त्याच्या खऱ्या नावासह फक्त एक खाते ठेवण्याची परवानगी देते.’ त्या भाजप खासदाराचे नाव माहीत आहे, पण जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत त्याचे नाव उघड करणार नाही, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.

चेकपॉइंट प्रणालीने पकडले भाजप खासदाराचे बनावट खाते
या वृत्तानुसार, फेसबुकच्या एका कर्मचाऱ्याने १९ डिसेंबर २०२० ला ५०० खाती चेकपॉइंटला पाठवली होती. ही खाती तीन नेटवर्कशी जोडलेली होती. तोच कर्मचारी २० डिसेंबरला चौथ्या नेटवर्कशी जोडलेली ५० खातीही चेकपॉइंटला पाठवण्याच्या प्रक्रियेवर काम करत होता. झांग यांनी सांगितले की, ‘या प्रणालीचा उपयोग प्रमुख खात्यांना चिन्हित करण्यासाठी केला जात आहे. त्याद्वारे मला समजले की, हे संशयित खाते भाजप खासदाराचे होते.’

बातम्या आणखी आहेत...