आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Facebook Upadates: Hate Speech, Violence, Triple Increase In Gangsterism On Social Space After Corona; News And Live Updates

फेसबुकचा अहवाल:कोरोनानंतर सोशल स्पेसवर हेट स्पीच, हिंसाचार, दादागिरीत तिप्पट वाढ

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक
  • आशियात संघटित द्वेष नियंत्रित करण्यासाठी मोहीम

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या कोरोना महामारीने व्हर्च्युअल आणि फिजिकल जगातील रेषा पुसट केली आहे. आधी जे गुन्हे समाजात होत होते ते आता सोशल स्पेसमध्ये आले आहेत. त्याची झलक व्हर्च्युअल क्राइममध्ये दिसत आहे. फेसबुकच्या अंतर्गत अहवालानुसार २०२० ची पहिली तिमाही म्हणजे कोरोना काळाच्या पहिल्या तीन महिन्यांत फेसबुकवर द्वेष पसरवणारे ४७ लाख कंटेंट आढळले होते, जे हटवावे लागले. तर २०१९ च्या अखेरच्या तिमाहीत हा आकडा फक्त १७ लाख होता. जो कंटेंट हटवण्यात आला तो नग्नता आणि लैंगिकता, हिंसाचार, बनावट खाती, दहशतवादाला प्रोत्साहन देणे, द्वेष पसरवणारे, गुंडगिरी व दुसऱ्या त्रास देणारे आणि मुलांच्या शोषणाशी संबंधित होता.

अहवालानुसार द्वेष पसरवणारा कंटेंट वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक स्तरावरील लॉकडाऊन होते. यामुळे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर द्वेष वाढला. तसेच सोशल स्पेसमध्ये द्वेषयुक्त सामग्री पकडण्यासाठी नवे मॉडेल तयार झाल्याने अशी सामग्री जास्त प्रमाणात दिसून आली. नव्या मॉडेलमुळे द्वेष आणि दहशतवादास चालना देणाऱ्या कंटेंटचे वेगवेगळे रूपही दिसून आले. द्वेष पसरवणारे मीम्सचा जास्त वापर करतात, तर दहशतीशी संबंधित कंटेंट दहशतवादी संघटनांकडून उपलब्ध केला जातो.

फेसबुकने जो कंटेंट हटवला त्यातील कमीत कमी ११ टक्के युजर्सच्या तक्रारींवरून हटवण्यात आला, तर इन्स्टाग्रामवर असा आक्षेपार्ह कंटेंट स्वत: कंपनीच्या वतीने हटवण्याचे प्रमाण आणखी खूप कमी आहे. इन्स्टाग्रामवर २०१९ च्या अखेरच्या तिमाहीत ४२ टक्के कंटेंट युजर्सच्या सांगण्यावरून हटवण्यात आले, तर २०२० च्या पहिल्या तिमाहीत ३१ टक्के कंटेंट युजर्सच्या तक्रारीनंतर हटवण्यात आले.

आशियात संघटित द्वेष नियंत्रित करण्यासाठी मोहीम
आशियाई क्षेत्रात सोशल प्लॅटफॉर्मवर द्वेषाची मुळे कमकुवत करण्यासाठी फेसबुकने ११ देशांच्या संघटनांना एकत्र अाणत सहिष्णुता मोहीम सुरू केली. तिला रेसिलिएन्स इनिशिएटिव्ह नाव देण्यात आले आहे. व्हर्च्युअल स्पेसमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करणे त्याचा हेतू आहे. इंटरनेट गव्हर्नन्स तज्ज्ञ हरीश चौधरी सांगतात की द्वेष, नग्नता आणि अराजकतेचे मॉडेल सोशल मीडिया कंपन्यांच्या बिझनेस माॅडेलसाठी फिट आहे. ही मोहीम म्हणजे दारू कंपन्यांनी ‘रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंग’ला चालना देण्याबाबत बोलावे अशी आहे.

बातम्या आणखी आहेत...