आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Facebook’s India Head Of Public Policy Ankhi Das Quits After Row Over Regulating Political Content

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादानंतर फेसबुकमधून राजीनामा:पब्लिक पॉलिसी हेड अंखी दास यांनी दिला राजीनामा, हेट स्पीचचे समर्थन केल्याचा आरोप लागला होता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबूकच्या पब्लिक पॉलिसी हेड अंखी दास यांनी कंपनीकडून राजीनामा दिला आहे. अंखी यांच्यावर आरोप लागला होता की, सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर हेट कंटेंटला थांबवण्यात त्या पक्षपात करत होत्या. फेसबुक इंडियाचे MD अजित मोहन यांनी याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, अंखी आता पब्लिक सर्विससाठी काम करतील. भारतात फेसबूकसाठी काम करणाऱ्यांपैकी अंखी एक आहेत. त्या 9 वर्षांपासून कंपनीत कार्यरत आहेत.

अंखी भारतासोबत फेसबुकच्या दक्षिण आणि मध्य आशियाच्या डायरेक्टर होत्या. हा राजीनामा त्यांनी अशावेळी दिला आहे, जेव्हा नुकतच सरकारने फेसबुक, ट्विटर आणि अमेझॉनला समन पाठवले होते. नुकतच हेट स्पीचप्रकरणी अंखी संसदेच्या संयुक्त संसदीय समिती (JPC) समोर हजर झाल्या होत्या. असे म्हटले जात आहे की, या वादामध्ये अडकण्यापूर्वीच अंखी यांनी राजीनामा दिला आहे.

संसदीय समितीसमोर हजर झाल्या होत्या अंखी

अंखी दास डाटा सुरक्षा विधेयक 2019 वर संसदेच्या ज्या संयुक्त समितीसमोर हजर झाल्या होत्या, त्याची अध्यक्षा भाजप खासदार मीनाक्षी लेखी होत्या. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर हेट स्पीचचे समर्थन केल्याचे आरोप लागले होते.

भाजप आणि हिंदुत्वाची बाजू घेतल्याचा आरोप लागला होता

अंखी त्या वेळेस चर्चेत आल्या होत्या, जेव्हा 'द वाल स्ट्रीट जर्नल'च्या रिपोर्टमध्ये त्यांचे नाव आले होते. रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहीले होते की, अंखी बीजेपी आणि हिंदुत्वावर केलेल्या पोस्टवर कारवाई करत नाहीत. 'द वाल स्ट्रीट जर्नल'च्या रिपोर्टनुसार, अंखी त्या टीमच्या मुख्य होत्या, ज्यांच्याकडे हेट स्पीटवर कारवाई करण्याची जबाबदारी होती.