आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविन पोर्टलवर नवीन सुविधा:आता लसीकरण सर्टिफिकेटला पोसपोर्टही केले जाऊ शकते लिंक, पर्सनल डिटेल्सही अपडेट करता येणार; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आरोग्य सेतू अॅपच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या कोविन वेब पोर्टलवर लसीकरण सर्टिफिकेटला पासपोर्टने लिंक करण्याची सुविधा सुरू झाली आहे. याच्या माध्यमातून यूजर आपली वैयक्तिक माहितींमध्येही सुधारणा करु शकतील. आरोग्य सेतू अॅपच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे.

काय आहे प्रक्रिया?

 • सर्वात पहिले कोविनच्या अधिकृत पोर्टल www.cowin.gov.in वर जावे.
 • आपला मोबाइल नंबर टाकून लॉग-इन करा.
 • 'रेज इन इश्यू' पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर पासपोर्ट पर्यायावर क्लिक करा.
 • ज्या व्यक्तीचे सर्टिफिकेटला तुम्हाला लिंक करायचे आहे त्याला ड्रॉप-डाउन मेन्यूतून निवडा.
 • आपला पासपोर्ट नंबर टाका आणि डीटेल भरुन सबमिट करा.
 • तुम्हाला काही सेकंदांमध्ये नवीन सर्टिफिकेट मिळेल.
 • जर सर्टिफिकेटची माहिती अपडेट करायची असेल, तर काय करावे?
 • जर तुमच्या लसीकरण सर्टिफिकेट आणि पासपोर्टची डीटेल मॅच करत नाही, तर तुम्ही लसीकरण सर्टिफिकेटमध्ये सुधारणा करु शकता. यासाठी या स्टेप्स फॉलो करा -
 • www.cowin.gov.in वर जावे.
 • आपला मोबाइल नंबर टाकून लॉग-इन करा.
 • रेज इन इश्यू पर्यायावर क्लिक करा.
 • सर्टिफिकेटमध्ये सुधारणेसाठी पर्यायावर क्लिक करा.
 • ड्याच्या डीटेल्स तुम्हाला बदलायच्या आहेत, त्याला ड्रॉप-डाउन मेन्यूतून निवडा.
 • जी माहिती अपडेट करायची आहे, तो पर्याय निवडा.
 • तपशील दुरुस्त करा आणि नंतर सबमिट करा.

वैयक्तिक माहिती अनेक वेळा अपडेट करु शकता का?
नाही, असे केले जाऊ शकत नाही. कोविन पोर्टलवर तुम्हाला तुमचे नाव आणि इतर तपशीलात सुधारणा करण्यासाठी केवळ एकच संधी मिळेल.

यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे?
सर्वात पहिले लक्षात ठेवा की, तुमचे पासपोर्ट आणि कोविन व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये असलेल्या नावात फरक असू नये. अन्यथा पोर्टल हे घेणार नाही. यामुळे लसीकरण रजिस्ट्रेशन करत असताना तेच नाव टाका, जे तुमच्या पासपोर्टवर लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...