आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fact Check: Bihar Government Minister Shares Photos Of Hyderabad Flyover To Show Development Of Muzaffarpur

फेक न्यूज एक्सपोज:बिहारच्या मंत्र्यांनी ज्या फ्लायओवरचे फोटो टाकून मुजफ्फरपुरचा विकास असल्याचे दाखवले, तपासात ते हैदराबादचे निघाले, शिवसेनेनेही साधला निशाणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार सरकारमधील मंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवरुन शेअर केले आहे.

काय होत आहे व्हायरल : सोशल मीडियावर बिहार विधानसभा निवडणुकांसाठी जारी करण्यात आलेला भाजपची एक निवडणुकीच्या प्रचारासाठीचा फोटो शेअर केला जात आहे. बिहार सरकारमधील मंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवरुन हा फोटो शेअर केला आहे.

जाहिरातीमध्ये पीएम मोदींचाही फोटो आहे. यासोबतच स्ट्रीट लाइट असलेल्या झगमगीत फ्लायओव्हर यामध्ये दिसतेय. खाली लिहिले आहे की - 'झगमगत आहेत मुजफ्फरपुरचे रोड'

आणि सत्य काय आहे?
व्हायरल होत असलेला फोटो गूगल सर्च केल्यानंतर तेलंगणाच्या आयटी मिनिस्ट्रीच्या फेसबुक पेजवरही मिळाला. मंत्रालयाच्या फेसबुक पेजवर हा फोटो बॅरमलगुडा जंक्शन येथील आरएचएस फ्लायओव्हरचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

म्हणजेच सोशल मीडियावर एका फ्लायओव्हरच्या निर्माणाविषयी दोन वेगवेगळ्या राज्यांचा दावा आहे. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही अशा मीडिया रिपोर्ट्सचा तपास केला, ज्यामध्ये हा फ्लायओवर कोणत्या ठिकाणचा आहे याची पुष्टी करता येऊ शकते.

इंडियन एक्सप्रेस वेबसाइटच्या वृत्तामध्ये बॅरमलगुडा जंक्शनवर बनवलेल्या फ्लायओव्हरच्या उद्धाटनाचे वृत्त आहे. फ्लायओव्हरचा फोटोही आहे. मात्र येथे फ्लायओव्हरचा ड्रोन फोटो आहे. बिहार सरकारच्या मंत्र्याद्वारा शेअर करण्यात आलेला फोटो आणि इंडियन एक्सप्रेसचा फोटो आम्ही पाहिला.

उड्डाणपुलाचा पृष्ठभाग आणि सीमा आकार दोन्ही छायाचित्रांमध्ये एकसारखेच आहेत. तसेच, स्ट्रीटलाइट्समधील अंतर देखील समान आहे. तेलंगणा सरकारचे मंत्री के.टी.रामा राव यांनी 9 ऑगस्ट रोजी एक ट्विट केले होते. या ट्वीटमध्ये आरएचएस उड्डाणपूलची चार छायाचित्रे वेगवेगळ्या अँगलने घेतली आहेत. एक फोटो तो देखील आहे, ज्याला बिहारच्या मुजफ्फरपुरचा असल्याचे सांगण्यात आले.

Google Earth या या सॅटेलाइट इमेजेसनेही पुष्टी होते की, फ्लायओव्हरचा जो फोटो बिहारचा असल्याचे सांगितले जात आहे तो खरेतर हैदराबादचा आहे.

सामनामधून टीकास्त्र
शिवसेनेने बिहारमधील मंत्र्यांनी केलेल्या फेक फोटोवरुन टीकास्त्र साधले आहे. शिवसेनेने सामनामध्ये म्हटले की, 'बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय? याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे. त्यांनी गडबड अशी केली आहे की, एक झगमगाट करणाऱ्या ‘स्ट्रीट लाइट’ने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शीर्षक दिले, ‘मुझफ्फरपूर स्ट्रीट लाइट योजना.’ आता जागरुक मतदारही कामास लागले व हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी ‘टाकलेला’ या फोटोतील रस्ता मिळाला नाही. कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी ‘स्वतःचे कार्य’ म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे!'

बातम्या आणखी आहेत...