आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fact Check | Claim: Mirage Cinema Is Buying Rajasthan's Famous Rajmandir Cinema, Miraj Cinema Itself Told Bhaskar The Claim Is Fake

फेक vs फॅक्ट:राजस्थानमधील प्रसिद्ध राजमंदिर चित्रपगृह विकल्याचा केला जातोय दावा, खरेदीदार मिराज ग्रुपने भास्करला सांगतिले - हा दावा खोटा आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय व्हायरल झाले

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. राजस्थानमधील प्रसिद्ध राजामंदिर सिनेमा हॉल विकले जात असल्याचा यामध्ये दावा केला जात आहे. तसेच मिरज ग्रुप नावाचा मल्टिप्लेक्स उद्योग राजमंदिर सिनेमा खरेदी करत असल्याचा दावा केला जात आहे.

राजमंदिर हे देशातील एकमेव सिनेमा घर आहे, जे स्वतः एक पर्यटन स्थळ देखील आहे. येथे लोक चित्रपटांसह चित्रपटगृहाची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला पाहण्यासाठी जातात.

सोशल मीडियावर राजमंदिर सिनेमाच्या विक्रीशी संबंधित हा मेसेज सर्वाधिक शेअर केला जात आहे.

*#जयपुर का #राज-मन्दिर #सिनेमाहॉल बिका...#*

*#प्राइड ऑफ राजस्थान का मिला था खिताब...#*

*#एशिया के सबसे बड़े राजमंदिर में अब कभी नहीं देख पाएंगे फिल्में #*

*#राजस्थान की राजधानी जयपुर में स्थित इस हाल में सिनेमा देखने वाले भी इसकी खूबियों के हो जाते थे मुरीद...#*

जगभरात एकापेक्षा एक चांगले चित्रपटगृहे आहेत. परंतु राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये स्थित राजमंदिर सिनेमा हॉल म्हणजे आशियातही आपली छाप सोडते…पण आता त्या ऐतिहासिक चित्रपटगृहात तुम्ही सर्व देशी-विदेशी चित्रपटप्रेमी चित्रपट पाहू शकणार नाही. जयपूरच्या जगप्रसिद्ध चित्रपटगृह राजमंदिराचा सौदा झाला आहे.

सुत्रांनुसार, शुक्रवारी झालेल्या या करारात मिराज ग्रुपने 1 अब्ज 30 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. सध्या त्याचे मालक भूरामल-राजमल सुराणा ज्वेलर्सचे मालक होते.

व्हॉट्सअ‍ॅपवरही या दाव्याशी संबंधित संदेश शेअर केले जात आहेत

फेसबुकवरही राजमंदिर चित्रपगृहाच्या विक्रीबाबत दावे केले जात आहेत.

फॅक्ट चेक तपासणी

  • वेगवेगळ्या कीवर्डचा शोध घेतल्यानंतरही आम्हाला इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही, जी जयपुरच्या प्रसिद्ध राजमंदिर चित्रपगृहाची विक्री होत असल्याची पुष्टी करते.
  • आम्हाला राजमंदिर सिनेमाच्या अधिकृत वेबसाइटवर असे कोणतेही नवीन अपडेत मिळाले नाही. ज्याद्वारे चित्रपगृहाला नवीन ग्रुपने खरेदी केल्याची पुष्टी होईल.
  • सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की मिराज ग्रुपने 1 अब्ज 30 कोटींमध्ये चित्रपटगृह विकत घेतले आहे. दाव्याच्या पुष्टीसाठी आम्ही मिराज ग्रुपशी संपर्क साधला. मिराज ग्रुपच्या टीमने ई-मेल द्वारे दैनिक भास्करला सांगितले की, ते राजमंदिर चित्रपगृह खरेदी करत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती खोटी आहे.

निष्कर्ष: सोशल मीडियावर राजमंदिर सिनेमाच्या विक्रीशी संबंधित दावे खोटे आहेत.

बातम्या आणखी आहेत...