आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेक न्यूज एक्सपोज:लव जिहादच्या वादादरम्यान तनिष्कविरूद्ध जामा मशिदीतून फतवा जारी ?जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय होत आहे व्हायरल: सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, तनिष्कच्या त्या जाहिरातीविरोधात जामा मशिदीकडून फतवा जारी झाला आहे, ज्यात हिंदू तरुणीला मुस्लिम घरातील सून दाखवण्यात आले आहे.

काय आहे सत्य ?

विविध की वर्ड टाकून गूगल सर्च केल्यानंतरही आम्हाला इंटरनेटवर अशा प्रकारची कोणतीही बातमी सापडली नाही, ज्यात जामा मशिदीने तनिष्कच्या जाहिरातीविरोधात फतवा जारी केल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांचे कोणतेच ऑफिशियल अकाउंट नाही, ज्यात कळू शकेल की, त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. परंतू, जामा मशीद, दिल्लीचे नायाब शाही इमाम सैय्यद शबान बुखारी यांचे फेसबूकवर वेरिफाइड अकाउंट आम्हाला सापडले.

सैय्यद शबान बुखारी यांच्या फेसबुक अकाउंटवर या कथित फतव्या संबंधी कोणतीच माहिती आम्हाला मिळाली नाही. बल्किबान बुखारींनी 14 ऑक्टोबरला तनिष्कच्या जाहिरातीचे कौतुक करणारी एक पोस्ट केली होती.

नायाब इमाम यांच्या फेसबुक पोस्टचा मराठी अनुवाद असा आहे -'मला ही जाहिरात खूप सुंदर वाटली. काही अतिरेक्यांच्या मनात फाळणी आहे.

आम्ही मुसलमान खरोखर चांगले मित्र आहोत आणि आम्ही सर्वजण एकमेकांवर प्रेम करतो आणि जेव्हा आपण सुरक्षेबद्दल बोलता, तेव्हा हिंदू आमच्या घरात अत्यंत सुरक्षित आहेत. प्रेम पसरवण्यासाठी तनिष्कचे आभार.'

यावरुन हे स्पष्ट होते की, जामा मशिदीच्या नायाब इमामांनी जाहिरातीचे कौतुक केल्यामुळे फतवा जारी होण्याची बातमी 'फेक न्यूज' आहे.

बातम्या आणखी आहेत...