आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवेंद्र फडणवीस यांची 15 मे रोजी मुंबईत दुसरी सभा घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर फडणवीस हे उत्तरसभा घेण्याची शक्यता आहे. मुंबई मनपासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. या प्रकरणी भाजपची पोलखोल यात्रा सुरू आहे आणि याचा भाग म्हणून ही सभा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 14 मे रोजी मराठवाडयात सभा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 14 मे रोजी मराठवाड्यात सभा घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लागले आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी मुंबईत बोलताना भाजपसह मनसेवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरेंचा नवहिंदुत्ववादी असा उल्लेख केला होता. तर भाजपकडून या नव हिंदुत्ववाद्यांचा वापर सुरू आहे. मात्र याचा फायदा होणार नाही असा टोला लगावण्यात आला होता.
तुम्ही रावणांकडून की रामाच्या बाजुने? - फडणवीस
मुंबईत सोमय्या मैदानावर भाजपची 1 मे रोजी सभा झाली होती. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेववर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात हनुमान चालिसा म्हटले तर सरकार उलटून टाकण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. शिवसेनेनी एकदा सांगावे की तुम्ही रामाच्या बाजुने आहे, की रावणाच्या बाजूने आहे. असा प्रश्न विचारत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही - देवेंद्र फडणवीस
तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, ही जीवन पद्धतीने प्रत्येक व्यक्तिला जगण्याचा आधार दिला हे लक्षात ठेवा. की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मराठवाडयातील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आगामी मनपा निवडणुकाच्या दृष्टीने भाजप आणि मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडतील, असे त्यांच्या मुंबईतील भाषणामधून दिसून आले आहे. त्यांनी या नवहिंदुत्ववाद्यांवर आणि भाजपवर मास्क काढून बोलायचे आहे, असे म्हटले होते. आणि यासाठी लवकरच एक जाहीर सभा घेणार आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यामुळे आता मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.