आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक VS फॅक्ट्स:पतंजलीच्या कोरोनिलला सरकारचा हिरवा झेंडा नाही, आयुष मंत्रालयाचे पत्र चुकीच्या दाव्यासह केले जात आहे व्हायरल 

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता आयुष मंत्रालयाने परवानगी दिली असल्याचा दावा पतंजलीकडून केला जात आहे.

काय आहे व्हायरल : एक पत्र होत आहे व्हायरल. त्या आधारावर असा दावा केला जात आहे की पतंजलीच्या कोरोनिल औषधाला आयुष मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे.

खरं तर 23 जून रोजी पतंजलीने दावा केला की त्यांनी बनविलेले औषध (कोरोनिल) कोविड -19 वर उपचार करण्यात प्रभावी आहे. आयुष मंत्रालयाने त्यावर आक्षेप घेत जाहिरातींवर बंदी घातली. यासोबतच मंत्रालयाला जी माहिती द्यायला हवी होती ती कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आता आयुष मंत्रालयाने परवानगी दिली असल्याचा दावा पतंजलीकडून केला जात आहे.

दाव्यासंबंधीत काही ट्विट 

आयुष विभागाचे हे पत्र होत आहे व्हायरल 

फॅक्ट चेक 

  • जे पत्र लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तेच पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे एमडी आचार्य बालकृष्ण यांनीदेखील फेसबुकवर पोस्ट केले आहे. याच पत्राला आयुष मंत्रालयाची मान्यता असे म्हटले जात आहे. प्रथम आम्ही पत्र वाचले.
  • पत्रात काय : 23 जूनला मंत्रालयाद्वारे पतंजलीला पत्र लिहिण्यात आले होते. याला उत्तर म्हणून पतंलजीने हे पत्र दिले आहे. या उत्तरात क्लिनिकल ट्रायल, ट्रायल साइटची माहिती, स्टडी प्रोटोकॉल आणि सॅम्पल्ससंबंधीत डेटाचा समावेश आहे. आता मंत्रालयाकडे टेडा अप्रूव्ह करण्यासाठी तेथे सत्यापित संशोधन कागदपत्रे आहेत.
  • म्हणजेच पतंजली आयुर्वेदने क्लिनिकल ट्रायलशी संबंधित कागदपत्रे सादर केल्याचे मंत्रालयाने पुष्टी केली आहे. आता आयुष मंत्रालय त्यांची चौकशी करेल.
  • प्रश्न असा आहे की मंत्रालयाने परवानगी देण्यासारखे काहीच सांगितले नाही. मग ही अफवा कशी पसरली? खरंतर आचार्य बालकृष्ण यांनी हे पत्र फेसबुकवर पोस्ट केले होते. यावर लिहिले होते की, आयुष वादाची पूर्तता.
  • आचार्य बाळकृष्ण आचार्यच्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढून लोकांनी ही अफवा पसरवण्यास सुरूवात केली की, हे औषध कोविड-19 वर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे.
  • आता मुद्दा क्लिनिकल ट्रायल्सचा आहे. ज्याच्या आधारावर दावा केला जात आहे की, कोरोनिल औषध कोविड-19 वर उपचार करणअयात फायदेशीर आहे. तर उत्तराखंडच्या आयुष्य विभागाच्या लायसेन्स ऑफिसरने एएनआयसोबत झालेल्या चर्चेत म्हटले की, पतंजलीला इम्युनिटी बूस्टर, कफ आणि फीव्हरचे औषध बनवण्याचे लायसेन्स जारी करण्यात आले होते. लायसेन्स ऑफिसरने स्पष्ट म्हटले की, परवानगी घेताना पतंजलीने कोरोना व्हायरसचा उल्लेख केला नव्हता.
  • कोरोनिल कोविड-19 वर रामबाण उपाय असल्याचे सांगितल्यावर आयुष्य मंत्रालयाने यावर आक्षेप घेतला होता. या संबंधी पीआयबीने एक प्रेस रिलीजही जारी केली होती.
  • निष्कर्ष पतंजलीने कोरोनिलवर एक क्लीनिकल ट्रायलची माहिती आयुष मंत्रालयाकडे सोपवली आहे. हे सत्य आहे. मात्र आयुष मंत्रालयाकडून अद्याप कोरोनिलला कोविड-19 च्या उपचारावर रामबाण उपाय म्हणून घोषीत करण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा आहे.
बातम्या आणखी आहेत...