आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Families Stopped Hoping For An Artificial Glacier, Hoping For Relief In The Summer

ग्राउंड रिपोर्ट:कृत्रिम हिमनगाच्या आशेवर कुटुंबे थांबली, उन्हाळ्यात दिलासा मिळेल ही आशा

लेह / मोरूप स्टॅजिनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाखच्या गावात पिण्याचे पाणी नाही, चमत्कार हाेण्याची आशा

सिंधू नदीजवळ लेहपासून ५५ किलोमीटरवर असलेले कुलुम गाव सध्या पिण्याच्या पाण्याचा सामना करत आहे. त्यामुळे लोकांवर गाव खाली करण्याची वेळ आली आहे. आता हे गाव शेती आणि रोजच्या गरजांसाठी बर्फवृष्टी आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत पुरेशा प्रमाणात बर्फ न पडल्याने पाण्याचे संकट वाढले आहे. गावात आरोग्य सुविधा आणि शाळाही नाहीत म्हणून ११ कुटुंबांपैकी सात कुटुंबे गाव सोडून निघून गेले. तरीही उरलेल्या लाेकांना बर्फाच्या स्तुपाच्या स्वरूपात बनविण्यात आलेल्या कृत्रिम हिमनगामुळे आशेचा किरण दिसत आहे. गावात उरलेल्या कुटुंबांना या हिमनगामुळे उन्हाळ्यात त्यांच्या पाण्याची गरज भासेल, अशी आशा आहे. गावकऱ्यांनी हिमालयन इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह, लडाख यांच्या मदतीने गावाच्या वरच्या भागात तीन स्तुप बनवले आहेत.

गावातील उरगन छाेरल म्हणते, आम्हाला बर्फाच्या स्तुपाकडून खूप आशा आहे. हा प्रकल्प यशस्वी हाेईल आणि पाणी टंचाई दूर हाेईल. लवकरच आमचे शेजारी परत येतील. आमचे पूर्वजही येथेच राहत हाेते पण अशी स्थिती कधी निर्माण झाली नाही. गेल्या वर्षी प्रयाेग म्हणून हा लहानसा हिमनग तयार केला हाेता आणि त्यामुळे गावातल्या लाेकांना खूप मदत मिळाली हाेती. गावातील ७५ वर्षांची पंटसाेग डाेल्मा म्हणते, शेजारी गेल्यामुळे खूप दु:खी वाटत आहे. त्यानंतर येथील गावकऱ्यांना काही चमत्कार हाेईल अशी आशा आहे. शेजारच्या उपशी गावातील ४० वर्षांचे कुंजंग नामग्याल म्हणाले, कुलुममध्ये पाच लिटर पाणीही मिळत नव्हते.

लाेक परतण्याची आशा : वांगचुक
या प्रकल्पाचे इनाेव्हेटर साेनम वांगचुक म्हणतात, लडाखच्या या गावातील पाण्याची समस्या संपवण्यासाठी कृत्रिम हिमनग खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे येथील गावे उजाड हाेत चालली आहेत. ही गावे पुन्हा वसवण्याचा उद्देश यामागे आहे. या गावातील यशकथा पर्यटकांनाही आकर्षित करतील. त्यामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत हाेऊ शकेल. कृत्रिम हिमनगाद्वारे लोकांच्या पाण्याची गरज भागवण्याच्या संदर्भात बोलताना वांगचुक म्हणाले, पाण्याचा उत्तम वापर करण्यासाठी ठिबक, तुषार सिंचन आणि हरितगृहा सारखी पर्यायी पद्धत व तंत्रज्ञानाचा शोध घेतला जाईल.

वसंत ऋतूतील पाण्याने बनताे कृत्रिम हिमनग
वसंत ऋतूतील पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी पर्याय म्हणून हिवाळ्यातील सांडपाणी साठवून कृत्रिम हिमस्तूप तयार केले गेले आहेत. एखाद्या काेनाप्रमाणे शंकुवर काही उंचावर वसंत ऋतुतील पाण्याचा उपयाेग करून पाइप तयार केले आहेत. शंकुवर जसे जसे पाणी गाेठायला लागते. त्याची उंची वाढवण्यासाठी त्यात आणखी पाणी शिंपडतात त्यामुळे एक विशाल कृत्रिम हिमनग तयार हाेताे.

बातम्या आणखी आहेत...