आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Family Doctor Said, There Was No Alcohol In Anjali's Stomach, Food In Autopsy, Friend's Claim Rejected

अंजली सिंह मृृत्यू प्रकरण:फॅमिली डाॅक्टर म्हणाले, अंजलीच्या पोटात अल्कोहोल नव्हते, ऑटाेप्सीमध्ये जेवण, मैत्रिणीचा दावा फेटाळला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या कंझावाला भागातील तरूणी अंजली सिंहच्या मृृत्यू प्रकरणात आणखी एक दावा समाेर आला आहे. अंजली नशेत हाेती, असा तिच्या मैत्रिणीचा दावा पीडितेचे फॅमिली डाॅक्टर भूपेश यांनी फेटाळून लावला आहे. डाॅक्टर म्हणाले, ऑटाेप्सी अहवालानुसार अंजलीच्या पाेटात अल्काेहाेल नव्हते. ती मद्यधुंद असती तर अहवालात पाेटातील केमिकलची नाेंद झाली असती. मात्र अहवालात पाेटात केवळ अन्न आढळले. ही सामान्य हत्या नाही. मृत्यूपूर्वी तिचा खूप छळ झाला. तिच्या शरीरावर ४० घाव आढळून आले हाेते, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.अंजलीची मैत्रीण निधीने पाेलिसांना दिलेल्या जबाबात अंजली नशेत असल्याचे म्हटले हाेते. अशाच अवस्थेत ती स्कूटी चालवण्याचा हट्ट करत हाेती. त्यातच तिची कारला टक्कर झाली. त्यानंतर दाेघीही खाली पडल्या. अंजली १२ किमीपर्यंत फरफटत गेली तर निधी भीतीने पळून गेलीया प्रकरणात नवे सीसीटीव्ही फुटेज समाेर आले आहे. त्यात अंजलीची मैत्रीण निधी रात्री २.३० च्या सुमारास घराबाहेर उभी असल्याचे दिसून येते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये निधीला उशिरा रात्री घरात जाताना दिसते.

बातम्या आणखी आहेत...