आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई होणे हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव असतो. सुरतच्या डिंपललाही यापासून वंचित राहायचे नव्हते. अलीकडेच तिने आयव्हीएफ पद्धतीने जुळ्यांंना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे तिचे लग्न झालेले नाही. सुरतच्या नानपुरा भागात राहणाऱ्या प्रतिष्ठित देसाई कुटुंबातील ४० वर्षीय मुलगी डिंपलने हा निर्णय घेतला.
खरं तर देसाई कुटुंबात डिंपल आणि दुसरी मोठी मुलगी रूपल आहे. घरच्यांनी दोघींसाठी खूप शोध घेतला, पण योग्य जोडीदार मिळाला नाही. दुसरीकडे पालकांचे वयही वाढत होते. हे लक्षात घेऊन दोघींनाही वाटले की, आपण लग्न करून निघून गेलो तर आई-वडिलांची काळजी कोण घेईल? शिवाय त्यांना असा जोडीदारही मिळाला नाही, जो सोबत ही जबाबदारी घेईल. त्यामुळे दोन्ही मुलींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर रूपल दुबईत कायमस्वरूपी स्थायिक झाली, तर डिंपलने इंजिनिअरिंग पूर्ण केले. पण डिंपलच्या मनात कुठेतरी आई होण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने आयव्हीएफच्या मदतीने सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली की, सामाजिकदृष्ट्या असे करणे खूप आव्हानात्मक होते. पण डिंपलने मन खंबीर करत डॉ. राजीव आणि रश्मी प्रधान यांचे मार्गदर्शन घेतले. दोन प्रयत्नांनंतर डिंपल गरोदर राहिली आणि तिने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही मुलांना भविष्यात गंभीर आजाराचा धोका नको म्हणून त्यांच्या स्टेम पेशींचा संग्रह करण्यात आला आहे. डिंपलचे पाऊल प्रेरणादायी आहे. पती गमावलेल्या, घटस्फोट घेतलेल्या आणि कोणत्याही कारणास्तव लग्न करू न शकलेल्या महिलांना असा निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.