आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे निधन, कोरोना संक्रमणामुळे 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर बेजान दारूवालायांचे 89 व्या वर्षी अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. कोरोना व्हायरस संक्रमणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. परंतू, त्यांचा मुलगा नास्तूर दारुवाला यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. नास्तुर यांनी भास्करशी बातचीतदरम्यान सांगितले की, वडिलांना निमोनिया आणि ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी बेजान दारुवाला यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

कोव्हिड-19 बाबत केली होती भविष्यवाणी

बेजान दारूवाला जगभर आपल्या भविष्यवाणीसाठा लोकप्रिय होते. जेव्हा भारतासह संपूर्ण जगात कोरोना पसरला होता, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, येणारा काळ कठीण असेल. दारुवाला भगवान गणेशाचे मोठे फक्त होते. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

संजय गांधींच्या मृत्यूबाबत केली होती भविष्यवाणी

त्यांनी 2014 आणि 2019 नरेंद्र मोदींच्या विजयाची भविष्‍यवाणी केली होती. दोन्ही वेळेस भाजपला संपूर्ण बहुमताने विजय मिळाला होता. त्यांनी यापूर्वी संजय गांधी यांचे अपघाती निधन होईल, अशी भविष्यवाणी केली होती. 23 जून 1980 मध्ये संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...