आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरवर्तन:गायक अरिजित सिंग संभाजीनगरच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जखमी, महिलेने खेचल्यामुळे हात दुखावला; स्वतःच दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा गायक अरिजित सिंग रविवारी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जखमी झाला आहे. त्याने स्वतःच एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. रविवारी संभाजीनगरमध्ये झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका उत्साही चाहत्याने खेचल्यामुळे आपला हात दुखावला, असे त्याने म्हटले आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजित सिंगचा लाइव्ह कॉन्सर्ट झाला. हा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. अरिजित एकाहून एक गाणी गाऊन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत होता. पण तेवढ्यात एका महिला चाहतीने त्याचा हात खेचला. त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे अरिजितचे संतुलन बिघडून त्याचा हात दुखावला गेला.

व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात अरिजित अत्यंत संयमाने आपल्या चाहत्याला संबोधित करताना संगीत रजनीच्या अशा खुल्या कार्यक्रमांत कलाकार व त्यांच्या मर्यादांचा सन्मान राखण्याची विनंती करताना दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओ अरिजित अत्यंत सन्मानाने आपल्या चाहत्याशी संवाद साधताना दिसून येत आहे. तो म्हणतो, "तुम्ही मला ओढण्याचा प्रयत्न केला. पाहा, माझा हात थरथर कापत आहे. मला वेदना होत आहेत. मला माझा हात हलवताही येत नाही. तुम्ही मला असे का ओढले? मी कार्यक्रम अर्धवट सोडून जाऊ का?" त्यावर चाहते नाही म्हणून ओरडले. त्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरुळीत सुरू झाला.

यूजर्सकडून अरिजितचे कौतुक

या घटनेचा एक व्हिडिओ इंटरनेवर व्हायरल होताच अनेकांनी अरिजितच्या संयमी प्रतिक्रियेचे कौतुक केले. एक यूजर म्हणाला की, 'अरिजितने ज्या पद्धतीने आपला संयम न गमावता आपल्या चाहत्याला शांतपणे समजावून सांगितले हे अत्यंत विलक्षण आहे.'

एक अन्य यूजर म्हणाला - 'या कलाकाराविषयी खूप आदर व सन्मान वाढला. त्याने अत्यंत शांतपणे परिस्थिती हाताळली.' अन्य एक यूजर म्हणाला की, 'तुम्ही अशा कलाकारांचा कधीही अनादर करू नका, ते फक्त आमच्यासाठी इतके दिवस परफॉर्म करतात.'

आणखी एका यूजरने म्हटले की, "या घटनेबद्दल एक चाहता म्हणून मला लाज वाटते. कृपया कलाकारांचा सन्मान राखा. अरिजित सिंग गेट वेल सून लेजेंड."

अरिजित तरुणाईच्या गळ्यातील ताईत

अरिजित सिंग हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय पार्श्वगायकांपैकी एक आहे. मर्डर-2 मधील "फिर मोहब्बत" या संगीताद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने केव्हाच मागे वळून पाहिले नाही. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्या भावपूर्ण आवाजाने त्यांनी गत काही वर्षांत खूप प्रसिद्धी मिळवली आहे.

अरिजितची खालील बातमी वाचा...

सुरांचा बादशाह:एकेकाळी रिअ‍ॅलिटी शोमध्ये रिजेक्ट झाला होता अरिजीत सिंग, घटस्फोटानंतर बालमैत्रिणीसोबत केले दुसरे लग्न

बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट गाणे देणारा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचा आज (25 एप्रिल) वाढदिवस असून तो 36 वर्षांचा झाला आहे. 'सांवरिया' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारा अरिजीत 'आशिकी 2' या चित्रपटातील गाण्यांमुळे एका रात्रीतून लाइमलाइटमध्ये आला. त्याने आतापर्यंत 'तुम ही हो', 'आज फिर', 'चन्ना मेरेया', 'फिर मोहब्बत करने चला', 'ऐ दिल है मुश्किल'सह अनेक हिट गाणी स्वरबद्ध केली आहेत.

25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबादमधील जियागंज येथे एका पंजाबी कुटुंबात अरिजीतचा जन्म झाला. त्याला संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले. अरिजीतला बालपणापासूनच गाण्याची आवड होती. त्याची आजी गायिका होती, तर मामीदेखील शास्त्रीय गायिका होती. अरिजीतने आपले शालेय शिक्षण विजय सिंह हायस्कूलमधून केले तर श्रीपत सिंह कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. येथे वाचा संपूर्ण बातमी...