आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Faridabad Nikita Murder Case Angry Mob Jammed Delhi Agra Highway, Demand To Hang The Culprits Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकिता मर्डर केस:​​​​​​​हरियाणामध्ये जमावाने दिल्ली-आग्रा हायवे केला जाम, दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी; पोलिसांचा लाठीचार्ज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 अक्टोबरला फरीदाबाद जिल्ह्याच्या बल्लभगढमध्ये पेपर देऊन परतत असलेल्या बी-कॉम थर्ड ईयरची विद्यार्थ्यीनी 21 वर्षांची निकिताची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती

फरीदाबादच्या बल्लभगढमध्ये 26 ऑक्टबरला पेपर देऊन परत येत असलेली विद्यार्थीनी निकिताची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. हरियाणाच्या बल्लभगढमध्ये रविवारी जमावाने फरीदाबाद-बल्लभगढमध्ये हायवे जाम केला. हे लोक निकिता तोमर हत्याकांडमध्ये दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. या प्रकरणाविषयी एक महापंचायत बोलावण्यात आली होती. यामध्ये हत्याऱ्यांना शिक्षा आणि निकिताला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यानंतर संतप्त जमावाने फरीदाबाद-बल्लभगढ हायवे जाम केला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थलावर पोलिस दल तैनात आहे.

आमदारावर बूट फेकला
महापंचायतमध्ये फरीदाबाद एनआयटीचे आमदार नीरज शर्मावर कुणीतरी बूट फेकला, यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. गर्दीने रोडवर जाळपोळ केली. अनेक वाहने आणि हायवेच्या एका ढाब्यामध्ये तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. एसीपी जयवीर राठी म्हणतात की, सध्या परिस्थिती सामान्य आहे. हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे.

हे आहे प्रकरण
26 अक्टोबरला फरीदाबाद जिल्ह्याच्या बल्लभगढमध्ये पेपर देऊन परतत असलेल्या बी-कॉम थर्ड ईयरची विद्यार्थीनी 21 वर्षांची निकिताची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. नूंह येथून हत्येचे आरोपी काँग्रेस आमदार आफताब अहमदचा चुलत भाऊ तौसीफ, मित्र रेहान आणि एक मदतनीस अजरुद्दीनला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात SIT तपास करत आहे. सरकारने या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात करण्यास मंजूरी दिली आहे.