आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर पोलिसाने तोंडात कोंबल्या नोटा:म्हैस चोरीच्या प्रकरणात 4 हजारांची मागितली होती लाच, 'व्हिजिलेंस'ला पाहताच हादरला

फरीदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाच्या फरीदाबाद स्थित सेक्टर-3 पोलिस चौकीत तैनात महेंद्र पाल नामक एका सब इन्स्पेक्टरला 4 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. यावेळी व्हिजिलेंस अर्थात दक्षता पोलिसांची या पोलिसाच्या नातलगांशी चांगलीच बाचाबाची झाली. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आरोपीने तक्रारदाराकडून प्रथम 6 हजार रुपयांची लाच घेतली होती. त्यानंतर त्याने आणखी 4 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर त्याने व्हिजिलेंसचा दरवाजा ठोठावला होता.

आरोपी पोलिस अधिकाऱ्याने व्हिजिलेंस पथकातील अधिकाऱ्यांशी अशी हुज्जत घातली.
आरोपी पोलिस अधिकाऱ्याने व्हिजिलेंस पथकातील अधिकाऱ्यांशी अशी हुज्जत घातली.

म्हैस चोरीचा गुन्हा दाखल

यासंबंधीच्या माहितीनुसार, सेक्टर-3मधील शंबूनाथ यादव यांनी वर्षभरापूर्वी एका व्यक्तीला 30 हजारांत गायीची विक्री केली होती. घेणाऱ्याने 10 हजार रुपयेच दिले होते. उर्वरित 20 हजार रुपये बाकी होते. त्याने पैसे न दिल्याने यादव यांनी आपली गाय परत आणली. पण गाय विकत घेणाऱ्या व्यक्तीने यादव यांच्यावरच म्हैस चोरी केल्याचा आळ घेतला. त्याने यासंबंधी त्यांच्या नातवावर गुन्हाही दाखल केला.

अटक करण्यात आलेला आरोपी सब इन्स्पेक्टर.
अटक करण्यात आलेला आरोपी सब इन्स्पेक्टर.

केस मॅनेज करण्यासाठी 10 हजारांची लाच

या प्रकरणाचा तपास सब इन्स्पेक्टर महेंद्र पाल यांच्याकडे होता. त्यांच्यावर हे प्रकरण गुंडाळण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापैकी 6 हजार रुपयांची रकम त्यांनी तक्रारदाराकडून घतेली होती. त्यानंतर डीजी व्हिजिलेंस यांच्याकडे यासंबंधीची तक्रार करण्यात आली. त्यानंतर डीजींच्या आदेशांनुसार स्टेट व्हिजिलेंसच्या अधिकाऱ्यांनी महेंद्र पाल यांना रेड हँड पकडण्याचा सापळा रचला.

व्हिजिलेंसच्या अधिकाऱ्यांनी आरोपीच्या तोंडातून नोटा काढल्या.
व्हिजिलेंसच्या अधिकाऱ्यांनी आरोपीच्या तोंडातून नोटा काढल्या.

नातलगांचा गोंधळ

आरोपी पोलिस उपनिरीक्षकाने सोमवारी तक्रारदाराला सेक्टर-3 च्या कम्युनिटी सेंटरमध्ये बोलावले होते. ते येथे एका लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. व्हिजिलेंसने येथे पूर्वीपासूनच सापळा रचला होता. तक्रारदाराने 4 हजार रुपयांच्या नोटा महेंद्र पाल यांच्या हातात देताच व्हिजिलेंस पथकाने त्यांना अटक केली. यावेळी आरोपीच्या नातलगांनी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. एवढेच नाही तर आरोपी पोलिसानेही नोटा तोंडात कोंबल्या. या प्रकरणी त्याची कसून चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...