आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmer Agitation Movement Or Terror ... Fear Among Locals Due To Incidents Of Gangrape, Burning Alive

ग्राउंड रिपोर्ट:आंदोलन की दहशत... गँगरेप, जिवंत जाळणे, हत्या आणि लुटीच्या घटनांमुळे स्थानिक लोकांत भीती

राई/बहादूरगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
लखबीरच्या हत्येनंतर संयुक्त किसान मोर्चाच्या तंबूत शांतता आहे. - Divya Marathi
लखबीरच्या हत्येनंतर संयुक्त किसान मोर्चाच्या तंबूत शांतता आहे.

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात हरियाणा-दिल्लीच्या सीमेवर १० महिन्यांपासून सुरू शेतकरी आंदोलनात ८ मोठ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ४ टिकरी आणि ४ कुंडलीमध्ये झाल्या. त्यात सामूहिक बलात्कार, हत्या, जिवंत जाळण्यासह लुटीच्या घटनेचा समावेश आहे. यामुळे लोकांत भीतीचे वातावरण आहे. भीती एवढी की, लोक दबक्या आवाजात सांगतात- जेव्हापासून आंदोलन सुरू आहे, त्या दिवसापासून आमचे कुटुंब संकटात आहे. मात्र, प्रशासन व सरकारच्या आश्वासनाशिवाय काही मिळत नाही. टिकरी व कुंडलीचे शेतकरी म्हणाले, आमचा घटनेशी काहीही संबंध नाही. पोलिसही आंदोलनात जायला भितात. कारण त्यांनाही धक्काबुक्की झाली आहे. गेल्या १० महिन्यांत कुंडली व टिकरी सीमांवरील लाेकांनी रस्ता खुला करण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात विचाराधीन आहे. मात्र, आतापर्यंत तोडगा निघाला नाही. सरकारने कुंडलीमध्ये एकतर्फी रस्ता खुला करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही रस्ता खुला करण्याबाबत ८ वेळा बैठक घेतली आहे. विविध नेत्यांनी तीन वेळा सीएमची भेट घेतली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.

तलवारी चालल्या, तर कधी निर्घृणतेची मर्यादा ओलांडली...
- बहादूरगडमध्ये २२ फेब्रुवारीला पंजाबच्या ३ तरुणांनी मुख्य बाजारातील ज्वेलरीच्या दुकानात लुट केली.
- बहदूरगडमध्ये ३० एप्रिलला प.बंगालच्या २५ वर्षीय युवतीवर गँगरेप झाला.
- बहादूरगडमध्ये २४ मार्चला भटिंडाच्या शेतकऱ्याची गळा घोटून हत्या केली.
- १७ जूनला कसार गावात आंदोलनात सहभागी लोकांनी एकाला जिवंत जाळले होते.
- कुंडलीमध्ये स्थानिक लोक व शेतकऱ्यांमध्ये २ वेळा भांडण झाले आहे.
- कुंडलीत निहंगने एका युवकावर तलवारीने हल्ला केला होता.
- कुंडलीत आता हात कापल्यानंतर एकाची हत्या करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...