आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या अजून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल आहे. त्याच्या मृत्यूचे कारण हर्ट अटॅक सांगण्यात येत आहे. घटना दिल्ली-हरियाणादरम्यान असलेल्या सिंघु बॉर्डरवर घडली. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव हरिंदर(50) आहे. यापूर्वी सोमवारी PGI रोहतकमध्ये एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.
दीप सिद्धूला बेड्या
दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेडदरम्यान लाल किल्यावर धार्मिक झेंडा फडकावणे आणि हिंसा भडकवल्याचा आरोप असलेल्या पंजाबी सिंगर दीप सिद्धूला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दीप सिद्धू अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका मित्राच्या संपर्कात होता. दीप त्या मित्राला व्हिडिओ पाठवायचा आणि तो मित्र सोशल मीडिया अकाउंटवर या व्हिडिओला अपलोड करायचा.
आज कुरुक्षेत्रमध्ये महापंचायत
कुरुक्षेत्रमध्ये आज महापंचायतचे आयोजन केल आहे. पण, यापुर्वीच एक वाद झाला आहे. येथे शेतकरी नेते गुरनाम सिंह चढ़ूनीला महापंचायतचे आमंत्रम दिले नव्हते. चढ़ूनी म्हणाले की, त्यांना या महापंचायतची माहिती नव्हती आणि त्यांनी दुसरीकडे आपले कार्यक्रम ठरवले होते. त्यामुळे ते आता य महापंचायतमध्ये जाणार नाहीत. परंतु, महापंचायतचे जसतेज संधू म्हणाले की, चढुनी यांना आमंत्रण दिले होते आणि येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
उद्या लोकसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोदी बोलू शकतात
सूत्रांनी सांगितल्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करू शकतात. यावेळी ते परत एकदा शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर भाष्य करू शकतात. मोदींनी सोमवारी राज्यसभेत राज्यसभेतही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.