आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्नदात्याचा प्रश्न:पंजाबात शेतकऱ्याची आत्महत्या, तर हरियाणामध्ये निघाले मोर्चे, कृषी विधेयकांविरोधात तीन राज्यांमध्ये आक्रोश वाढला

चंदीगड/नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र पतियाळातील आहे. येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले - Divya Marathi
छायाचित्र पतियाळातील आहे. येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले
  • राजस्थानमध्ये उद्यापासून बाजार समित्यांमध्ये संपाचा इशारा

केंद्र सरकारच्या कृषिसंबंधित विधेयकांविरोधात पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात आंदोलन वाढले आहे. यादरम्यान पंजाबमधील मुक्तसार जिल्ह्यात विधेयकाच्या विरोधात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. बीकेयूचे महासचिव सुखदेव सिंह यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भरपाई देण्याची मागणी केली. अमृतसरमध्ये शेतकऱ्यांना सरकारचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. येथील शेतकरी नेते गुरबनचसिंग यांनी केंद्र सरकारच्या विधेयकामुळे पंजाबमधील शेतकरी संपुष्टात येईल असे म्हटले आहे. पंजाबमध्ये सुमारे १० संघटना कृषी विधेयकांचा विरोध करत आहेत.

दुसरीकडे, हरियाणातील रोहतकसह इतर जिल्ह्यांमध्येही शेतकरी आणि आडत्यांनी मोर्चे काढले. रोहतक बाजार समिती असोसिएशनचे अध्यक्ष डिंपल बुद्धवार म्हणाले, हे विधेयक जोपर्यंत माघारी घेतले जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. त्यांची संघटना पूर्ण हरियाणामध्ये शनिवारी उपायुक्त कार्यालयांना घेराव घालेल. हरियाणामध्ये सुमारे २० संघटनांनी २५० बाजार समित्यांमध्ये संपाचा इशारा दिला आहे. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती), शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) आणि शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार ही विधेयके लोकसभेत पारित केली आहेत.

कृषी धोरणांवर दिवसभरात राजकारण पेटले
शिअद : विधेयक मागे घेईपर्यंत केंद्र सरकारशी चर्चाही नाही, बादलांचा इशारा

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी माध्यमांना सांगितले, कृषी विधेयके मागे घेतली जात नाहीत तोपर्यंत आमच्या पक्षाकडून केंद्र सरकारसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही. आमचा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. याबाबत पक्षाचे नेते राज्यात बैठक घेतील.

काँग्रेस : शेतकऱ्यांसोबत आहात की भाजपसोबत हे पक्षांनी निश्चित करावे : चिदंबरम
काँग्रेसचे नेते पी चिदंबरम म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्षाने आपण शेतकऱ्यांसोबत आहोत की शेतकऱ्यांना अडचणीत टाकणाऱ्या भाजपसोबत आहोत हे निश्चित करायला हवे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांना भाजप बदल करून सादर करत आहे.

हरियाणा सरकार : विरोधकांवर टीका, म्हणाले- शेतकऱ्यांची दिशाभूल करू शकणार नाही
हरियाणाचे कृषिमंत्री जयप्रकाश दलाल म्हणाले की, विरोधक जास्त काळ कृषी विधेयकांवरून शेतकऱ्यांची दिशाभूल करू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवण्याचा संकल्प केला आहे. विरोधकांकडून राजकारण सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...