आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंजाबी अभिनेता याच्यामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान लाल किल्ल्यावर हिंसा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. भारतीय किसान युनियनचे नेता गुरनाम सिंग यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले की, शेतकरी संघटनांचा लाल किल्ल्यावर जाण्याचा कोणताही मानस नव्हता. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावले आणि आउटर रिंग रोडवरून लाल किल्ल्याजवळ नेले. शेतकरी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत राहतील. हे आंदोलन धार्मिक आंदोलन नसल्याचे ते म्हणाले. यादरम्यान लाल किल्ल्यावर आपणच झेंडा लावला असल्याचे दीप सिद्धूने एक व्हिडिओ जारी करत म्हटले.
यादरम्यान दीप सिद्धूने म्हटले की, लाल किल्ल्यावर त्याने झेंडा फडकावला मात्र त्याच्यावर लावलेले आरोप त्याने फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला की, काही संघटनांच्या नेत्यांनी आधीच ठरलेल्या मार्गाचे पालन करणार नसल्याचे म्हटले होते, परंतु भारतीय शेतकरी संघटनेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दीपने म्हटले आहे.
खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप, NIA नोटीस बजावली
दीप सिद्धू सलग दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सक्रीय आहे. काही दिवसांवपूर्वी दीपला सिख फॉर जस्टिस (SFJ)सोबत असलेल्या संबंधाबाबत राष्ट्रीय तपास संस्थनेने नोटीस देखील जारी केली होती. दीपने मागील वर्षी आंदोलनादरम्यान किसान युनियनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यावेळी त्याने शंभु मोर्चा नावाने नवीन शेतकरी संघटनेची घोषणा देखील केली होती. तेव्हा त्याच्या मोर्चाला खलिस्तान समर्थक वाहिन्यांचा पाठिंबा मिळाला होता.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल
गेल्या लोकसभा निवडणुकीत दीपने गुरदासपूरचे भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांच्यासाठी प्रचार केला होता. दीप सिद्धची भाजपशी जवळीक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि खासदार सनी देओल यांच्यासह त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कीर्ती किसान युनियनचे उपाध्यक्ष राजिंदरसिंग दीपसिंह वाला म्हणाले की, सुरुवातीपासूनच केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनाला जातीय रंग द्यायचा होता. दीप सिद्धूने त्यांची चांगली सेवा केली.
लाल किल्ल्यावर झेंडा फडकावल्यानंतर सिद्धूचा व्हिडिओ समोर आला
दीप सिद्धूने शेतकरी संघटनांच्या आरोपांवर एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले आहे. सिद्धूने म्हटले की, 25 जानेवारी रोजी शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर आणि सतनाम सिंग पन्नू यांनी संयुक्त किसान मोर्चाने दर्शविलेल्या मार्गावर परेड करणार नसल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी, तरुणांनी मोर्चाचा मंच ताब्यात घेतला होता आणि पोलिसांनी दिलेल्या मार्गावर मोर्चा काढणार नसल्याचे सांगितले होते. असे असूनही मोर्चाने याकडे लक्ष दिले नाही. आणि 26 जानेवारीला ट्रॅक्टर परेड निश्चित मार्गावर झाली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.