आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmer Oprotest News And Updates; AC And Fan Will Be Installed At The Protest Site, 100 CCTV And Control Rooms To Monitor

शेतकरी आंदोलन:आता आंदोलनस्थळी लागणार एसी आणि फॅन, लक्ष ठेवण्यासाठी 100 सीसीटीव्ही आणि कंट्रोल रुम

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारच्या भूमिकेनंतर आंदोलन अजून तीव्र करण्याच्या तयारीत शेतकरी

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेली शेतकऱ्यांची लढाई अजून वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेला हिंसाचार आणि इतर अनेक आरोप-प्रत्यारोपानंतर आता शेतकरी सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर सीसीटीव्ही, वायफाय आणि राहण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तु आणण्याच्या तयारीत आहेत. जोपर्यंत कायदे परत घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमीका यापूर्वीच संयुक्त शेतकरी मोर्चाने घेतली आहे.

केंद्र सरकारकडून दिल्लीच्या सीमेवर इंटरनेट बंद केल्यामुळे इंटरनेटच्या वापरासाठी आंदोलक ‘ऑप्टिकल फायबर’चा वापर करणार आहेत. याशिवाय, येणाऱ्या उन्हाळ्याच्या वातावरणात गर्मी होऊ नये, यासाठी इलेक्ट्रिक फॅन आणि एसी लावली जाणार आहे.

सिंघु बॉर्डरवरील सर्व व्यवस्ता पाहणारे दीप खत्री यांनी सांगितले की, या ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमरे लावले जात आहेत. याशिवाय, लक्ष ठेवण्यासाठी एक कंट्रोल रुम बनवली आहे. तसेच, रात्री पहारा देण्यासाठी आणि ट्रॅफिक सांभाळण्यासाठी 600 जणांची टीम बनवली आहे. 10 ठिकामी एलसीडी स्क्रीन लावली आहे.

बातम्या आणखी आहेत...